Akola Lok Sabha Constituency : केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे जाहीर करत काँग्रेस, शिवसेनेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाची वेळ आली, त्यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीला काँग्रेसला दोनपेक्षा अधिक जागा द्यायच्याच नव्हत्या, असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. भाजपबरोबर महाविकास आघाडीची मॅच फिक्सिंग असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची उमरखेड येथे प्रचार सभा झाली. त्यामध्ये आंबेडकर बोलत होते. या वेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग असा शब्द वापरला. दुर्दैवाने महाविकास आघाडीनेच तो शब्द प्रत्यक्ष महाराष्ट्रात उतरवला असं मी मानतो. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जो उमेदवार देण्यात आला आहे, तो उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाविरोधात लढू शकत नाही, असं कल्याणमधील माणसंच म्हणत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाना पाटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आणि विड्रॉल झाली. नांदेडमध्ये (Nanded) जो उमेदवार दिला तो आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतो. तो निवडणुकीत प्रचार करेल की तब्येत सांभाळेल? अशी अनेक उमेदवारांची उदाहरणे देऊ शकतो. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली आहे, असा आरोप माझा आहे. रामटेकमधील काँग्रेसमधील उमेदवार याचं कास्ट सर्टिफिकेट टिकणार नाही हे सर्वांनाच माहीत होतं तरीही जबरदस्तीने त्यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्या पतीला उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेस (Congress) म्हणतं आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मत द्या, मग वंचितला दोनच जागा का द्यायला निघाले होतात? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी उपस्थित केला. जेव्हा मी आमचा लढा उभारू असं म्हटलं तेव्हा दोन घ्या, दहा घ्या म्हणत होते. खरं म्हणजे यांना दोनपेक्षा जास्त जागा द्यायच्या नव्हत्याच, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी उबाठा समोर नांगी टाकलेली आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस तिथे असणाऱ्या सहकारी बँकेचा घोटाळा झाला. त्या घोटाळ्यात सात बँका बंद करण्यात आल्या. 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये नरेंद्र मोदी यांचेसुद्धा नाव आहे. काँग्रेसबरोबर बोलणी सुरू होते, तेव्हा त्यांना मी सांगितलं असे प्रश्न उपस्थित करू. नरेंद्र मोदी हिंदू राष्ट्र करायला निघालेले, मग 2014 पासून 17 लाख लोकांनी हिंदू धर्म सोडला हा प्रश्न संघाला मोहन भागवतांना विचारले पाहिजे, असे मी म्हणालो होतो, असेही आंबेडकर म्हणाले.
(Edited By : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.