योगेश फरपट-
Akola News : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहे. तसेच काही ठिकाणी पाठिंबा दिला तर काही ठिकाणी उमेदवार देणे बाकी आहे. यात स्वत: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील अकोल्यातून उभे आहेत. त्यांनी प्रचार सभेत बोलताना मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
अकोट येथील प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर हे सोमवारी (ता.22) बोलत होते. देशात 2014 साली भाजप आणि संघाचे विचाराचे सरकार आले. तत्पूर्वी या शासनाने भारतवासीयांना अनेक खोटे आश्वासन दिले. सत्तेत आल्यानंतर अनेकांची मुस्कटदाबी केली. मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून देशातील 17 लाख कुटुंबीयांनी भारत देश सोडला, भारताचे नागरिकत्व सोडले असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते अॅड . प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, भारतातील लोक देश सोडून दुसऱ्या देशात का स्थायिक होत आहे. आपल्या देशातील हुशार तरुण मुले दुसऱ्या देशात नोकरीसाठी का जातात याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. 2014 पासून भारतातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, वंचित, शोषित, महिला हा अन्याय सहन करीत आहेत. आता हे सरकार उखळून फेकण्याची वेळ आली आहे. तेव्हा सर्वांनी एकजुटीने हुकूमशाही वृत्तीचा निषेध करून वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी असे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले.
मोदी यांनी सर्वसामान्यांचे शोषण केले आणि मोठमोठे उद्योगपतींना संरक्षण दिले. 2014 नंतर भारतातील किती लोकांनी देश सोडला ? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता तेव्हा उत्तरात ही धक्कादायक माहिती उघड झाली, अशी माहिती त्यांनी प्रचार सभेत दिली.
मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. आजही शेतकरी दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यावर एवढी वाईट अवस्था आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात आली नाही, असंही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दातकरांचे आवाहन...
अकोला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दिलेला उमेदवार हा मुका बहिरा आहे. त्याला राजकारणाचा अजिबात अनुभव नाही, फक्त घराणेशाही चालवण्यासाठी हा उमेदवार आपल्यावर लादला आहे. तसेच काँग्रेसने दिलेला उमेदवार हा कट्टर संघाशी व विश्व हिंदू परिषदेची नाळ जुळलेला आहे, सर्वांनी जागरूक राहून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पुरुषोत्तम दातकर यांनी केले.
ते म्हणाले, मी कट्टर काँग्रेसी आहे आणि मी काँग्रेस पक्षातच आहे. परंतु, बाळासाहेबांच्या समर्थनार्थ मी वंचितच्या व्यासपीठावरून बोलत आहे. माझ्या पक्षाने माझ्यावर काहीही कारवाई केली तरी चालेल. मात्र, बाळासाहेबांचे समर्थन केल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.