BMC Mayor Election: शिंदेंनी खेळलं ‘इमोशनल कार्ड’; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांत शिवसेनेचाच महापौर हवा! राजकारणात खळबळ

Eknath Shinde Demand Shiv Sena Mayor In BMC: बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर हवा अशी मागणी करत एकनाथ शिंदेंनी इमोशनल कार्ड खेळले असून सत्तेसाठी भाजपवर दबावाचे राजकारण सुरू आहे.
Eknath Shinde Demand Shiv Sena Mayor In BMC:
Eknath Shinde Demand Shiv Sena Mayor In BMC:Sarkarnama
Published on
Updated on

BMC Mayor Election Shiv Sena latest News: महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. उद्या (गुरुवारी) महापौर पदासाठी लॉटरी काढली जाणार आहे, त्यानुसार पदाचे आरक्षण निश्चित होईल. या पार्श्वभूमीवर महापौरांची निवड २९ किंवा ३० जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. महापौर पदावरुन भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ सुरु आहे.

येत्या २३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. हीच संधी एकनाथ शिंदे यांनी साधली आहे. त्यांनी मुंबईच्या महापौर पदावर शिवसेना दावा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपला मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांची नितांत गरज आहे, त्यामुळे शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ (Bargaining Power) कमालीची वाढली आहे.

मुंबईत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. २९ जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आता ‘महापौरपदा’वर आपला दावा ठोकला आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

२३ जानेवारी २०२६ पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने, या ऐतिहासिक वर्षात शिवसेनेचाच महापौर असावा, अशी भावनिक साद घालत शिंदेंनी भाजपवर मोठा राजकीय दबाव निर्माण केल्याचे दिसते.

महापौरपदाचे आरक्षण उद्या (२२ जानेवारी) मंत्रालयात जाहीर होणार आहे. जर हे पद ‘खुल्या’ प्रवर्गासाठी किंवा ‘ओबीसी पुरुष’ प्रवर्गासाठी निघाले, तर भाजप आणि शिंदे गटात पदाच्या वाटपावरून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Demand Shiv Sena Mayor In BMC:
Supreme Court News: एका 'डोंगरानं' अडवला धनुष्यबाण! शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी लांबणीवर काय आहे कारण?

शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीने निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला होता. त्यानिमित्ताने २०२६ हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. “शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा अशी तीव्र भावना आहे,” असे विधान करून एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com