

Maharashtra Legislative Council News : मुंबईत एकेकाळी गॅंगवॉर होत होते. शेकडोंचे बळी. जात होते. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी ठरवले आणि गॅंगवॉर संपुष्टात आणले. आता गॅंगवॉर पुन्हा डोके वर काढते की काय, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले. (Darekar told the story of Borivali's Ashokavan to the audience)
हे सांगताना बोरीवलीच्या अशोकवनचा प्रसंग दरेकर यांनी सभागृहाला सांगितला. विभीषण वारे नामक कार्यकर्त्यावर ५५ जणांनी हल्ला केला. तब्बल २९ वार त्याच्या डोक्यावर तलवारींनी केले. कट रचून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. गृहखात्याला हे शोभणारे नाही. हल्ला झाल्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात भरती करून घेण्यात आले नाही.
तक्रार तात्काळ घेतली नाही नंतर एफआयआर घ्यायला लावला. या घटनेतील सर्व आरोपी तडीपार आहेत. अशा गोष्टी पुन्हा झाल्या तर मुंबईत पुन्हा गॅंगवॉर उफाळून येण्याची भिती दरेकरांनी व्यक्त केली. दहिसरच्या पोलिस इन्स्पेक्टरला तात्काळ निलंबित केले पाहिजे. त्याच्या कारभाराची चौकशी केली पाहिजे.
मृत झालेल्या माणसाची जागा संगनमताने हडप केली गेली. शंभर ते दीडशे कोटीच्या जागा हडप केल्या. तक्रार करूनही आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्याचा साक्षीदार विभीषण वारे होता. घोटाळ्याचा साक्षीदार होता. त्यामुळे त्याला संपवण्यासाठी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
दीपक शहा अनेक वर्षापासून इस्टेट एजंट म्हणून काम करतात. सुभाष घराटे एसकेटी बिल्डरचे मालक आहेत. दुसरे जितेश वसंत देशपांडे एस.वी. रोड सांताक्रुज येथे त्यांचे कार्यालय आहे. २६ जून १९६२ रोजी एस.आर. चौघुले यांच्या ३७,४८२ चौरस मीटर जमिनीच्या संदर्भात व्यवहार झाला. स्व. जया कानिया या मूळ मालक होत्या. हे ठिकाण दहीसर तालुक्यात येते. ही मालमत्ता हडपण्यासाठी ८,८३६ चौरस मीटर जमिनीचे बनावट दस्तावेज बनवले.
ही जागा हडपण्यासाठी स्टॅंप ड्यूटी ऑफिसरचे खोटे सील तयार केले. बनावट शिक्के मारले. आयपीसी कलम २५६, २५७, २५९, २६० अन्वये आरोपींनी गुन्हा केलेला आहे. कामकाजाच्या पद्धतीनुसार २९ ऑगस्ट २०१६ ला बनावट दस्तावेज बनवले. सुभाष कराटे याला हस्तांतरित केले. जितेश वसंत देशपांडे आणि इतरांच्या नावे नोंदणी केले. १२ कोटी ८५ लाखाचे बोगस व्यवहार केले. मनलाल श्रीपती चव्हाण २०१८ ला मरण पावले. त्यांना रक्कम दिलीच नाही. रक्कम रोख दाखवण्यात आली. ११ कोटी ७ लाख अद्याप दिलेले नाहीत, असेही दरेकर म्हणाले.
२८ ऑगस्ट २०१६ ला बनावट साक्षीदारांपैकी एक विभीषण वारे आहे. दुसरे साक्षीदार कौतुक मामनकर आहे. वारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसआयटी नेमावी. पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील ज्या तारखेपासून रुजू झाले, तेव्हापासून त्यांचीही चौकशी करावी. पोलिसांच्या (Police) माध्यमातून जी लूटमार सुरू आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे.
अशा प्रवृत्तींनी डोके वर काढले, तर पुन्हा गॅंगवार उफाळून येईल. या प्रकरणाचे सत्य महाराष्ट्रासमोर (Maharashtra) आले पाहिजे. मुंबई पोलिसांचे नाव खराब होऊ नये, जर सरकारने आता काही केले नाही, तर सरकारवरचा (State Government) जनतेचा विश्वास उडेल, असेही दरेकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.