Gondia News : जुन्या वादातून ग्रामपंचायत कार्यालयातच तुफान हाणामारी; पोलिसांत गुन्हा दाखल

Vidarbha Crime News : न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर बचावासाठी वकिलांचा युक्तिवाद....
Gondia News
Gondia NewsSarkarnama
Published on
Updated on

Gondia News : ग्रामपंचायतमध्ये आरामशीर बसलेल्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा खुर्द गावात घडली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून हल्ला करणाऱ्यास अटक केली आहे

तुमखेडा खुर्द गावात शुक्रवारी (ता. 22) हा प्रकार घडला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावचे सरपंच आशिष हत्तीमारे (वय 35) यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. गावातच राहणाऱ्या प्रेमलाल मेंढे (वय 55) यांचा हत्तीमारे यांच्याशी जुना वाद होता. तुमखेडा खुर्द येथे घडलेल्या या हाणामारीचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. गोंदिया जिल्ह्यातील विविध सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.(Crime News)

Gondia News
Ashok Chavan News : 'ईडब्ल्यूएस' निर्णय योग्य पण क्रेडिट महाविकास आघाडीला, अशोक चव्हाण म्हणतात...

हत्तीमारे हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात काम करत बसले होते. त्यावेळी मेंढे कार्यालयात आलेत. त्यांनी हत्तीमारे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हत्तीमारे यांनी त्यांना उत्तर देताच मेंढे यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रत्यूत्तरात सरपंचांनीही हात उचलला. त्यानंतर दोघांमध्ये वाद प्रचंड वाढला. एकमेकांना अश्लील शिवीगाळ करीत हत्तीमारे आणि मेंढे आपसात भिडले. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोघांनाही दुखापत झाले.

ग्रामपंचायतमध्ये (Gram Panchyat) बसलेल्या इतर सदस्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाद बराच विकोपाला गेला होता. ग्रामपंचायतच्या आवारामधून बाहेरपर्यंत येत दोघानांमध्ये जमके फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ही घटना हत्तीमारे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड केली. याविषयी सरपंच आशिष हत्तीमारे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मेंढे यांनी चाकूने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रेमलाल मेंढे विरुद्ध गुन्हा दखल करीत त्यांना अटक केली हत्तीमारे आणि मेंढे यांच्यात नेमका कोणत्या कारणामुळे वाद आहे, हे कळू शकले नाही. या हल्ल्यामुळे तुमखेडा खुर्द गावातील वातावरण मात्र तापले आहे.

आम्ही या हल्ला प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक केली आहे. गावातील सरपंच आणि हल्ला करणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातूनच आरोपी प्रेमलाल मेंढे हल्ला करण्याच्या तयारीनेच ग्रामपंचायत कार्यालयात आल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून दिसत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भंडारा ग्रामीण पोलिसांनी दिली.

Gondia News
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

तुमखेडा खुर्द येथे घडलेल्या या हाणामारीचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. गोंदिया जिल्ह्यातील विविध सोशल माध्यमांवर (Social Media) हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. गावात घडलेल्या या घटनेची गोंदियातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. सरपंच आणि हल्ला करणाऱ्यामधील हा वाद मिटावा यासाठी आता गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com