Buldhana : तुपकरांना अटक होताच बुलढाण्यात उमटले संतप्त पडसाद; रेल्वेरोकोचाही प्रयत्न

Ravikant Tupkar News: जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको; टायर टाळत सरकारचा निषेध
Farmers Protest at Buldhana
Farmers Protest at BuldhanaSarkarnama
Published on
Updated on

Farmer's Protest : शेगाव येथील लोहमार्ग पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना नोटीस दिल्यानंतर पोलिस कारवाई टाळण्यासाठी ते भूमिगत झाले होते. तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून 18 जानेवारीला अटक केली आहे. तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

तुपकर यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. कुठे टायर जाळत निषेध केला, तर कुठे रस्तारोको करण्यात आला. तुपकरांना ठेवण्यात आलेल्या पोलिस स्टेशनसमोर तणावसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला आहे.

Farmers Protest at Buldhana
रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनादरम्यान झाली होती जाळपोळ व तोडफोड…

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा भाग म्हणून रविकांत तुपकर यांनी 19 जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्लीसह गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा दिला होता.

हे आंदोलन करपूर्वी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली. त्यामुळे तुपकर रात्रीपासून भूमिगत होते. पोलिसांनी त्यांच्या घराभोवतीही कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यांना शोधण्यासाठी पोलिस कामाला लागले.

गुरुवारी (ता. 18) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी तुपकरांना राजूर घाटातून अटक केली. तुपकर यांच्यावर कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना आता मेहकर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तुपकरांना आता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दुसरीकडे तुपकरांच्या अटकेचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहेत. तुपकर यांना अटक झाल्यानंतर ठिकठिकाणी टायर जाळत निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अटकेच्या निषेधार्थ मेहकर-चिखली हायवे रोखण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तुपकरांना बुलढाणा येथून मेहकर येथे नेण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अटक झाली म्हणून काय झाले, असे म्हणत रेल्वे रोको हे आंदोलन कार्यकर्ते करतील असे त्यांनी तुपकर यांनी सांगितले.

रेल्वेरोकोचा प्रयत्न

शुक्रवारी (ता. 19) पहाटे रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या सहकार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Farmers Protest at Buldhana
Ravikant Tupkar : मोठी बातमी! शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; 'हे' आहे कारण?

राजू शेट्टी सरसावले

कोणतेही आंदोलन करण्याआधी पोलिस ताब्यात घेतात असा अनुभव आहे. त्यामुळे तुपकर यांनी भूमिगत होऊन, पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन यशस्वी करायला हवे होते. अटक करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. संग्रामपूरमधील मोर्चा झाल्यानंतर या संदर्भातील माहिती घेतो अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

तुपकर यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता त्यांना न्यायालयात घेऊन जाणार आहेत. तुपकरांच्यावतीने जामिन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. सुनावणी झाल्यानंतर जामिन अर्जावर आदेश होणार आहे.

गेल्या वेळीही पोलिसांनी आंदोलनापूर्वीच तुपकरांना अटक केली होती. त्यांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत त्यांना जामिन मंजूर केला होता. आज नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Farmers Protest at Buldhana
'शेतकरी संतापलाय, संयम संपत आलाय ' तुपकरांचा सरकारला इशारा | Ravikant Tupkar on Farmers Protest

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com