Ravikant Tupkar : मोठी बातमी! शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; 'हे' आहे कारण?

Vidarbha Political News : याचवेळी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात केला होता.
Buldhana News : Ravikant Tupkar
Buldhana News : Ravikant TupkarSarkarnama

Buldhana News : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून सोयाबीन,कापसाच्या दरवाढीसह इतर मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक करत असल्याचा आरोप करत तुपकरांनी शुक्रवारी (ता.19) रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली होती.याचदरम्यान, रविकांत तुपकरांना पोलिसांनी अटक केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 19 जानेवारीला रेल्वे रोकोचा इशारा दिल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भूमिगत झाले होते.याचवेळी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात केला होता. सध्या रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Buldhana News : Ravikant Tupkar
Ram Mandir Opening : मी आस्तिक म्हणून सांगते...; शरद पवारांना नीलम गोऱ्हेंचा सल्ला

शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन-कापूस प्रश्नावर लढा उभारला आहे.केंद्र व राज्य सरकारला वारंवार वेळ देऊनही ते सोयाबीन कापसाबद्दल बोलायला तयार नसल्याने रविकांत तुपकर यांनी 19 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

सोयाबीन कापूस प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्रीपासून तुपकर भूमिगत होते. अखेर पोलिसांनी त्यांना राजुरा घाटातून ताब्यात घेतले. 19 जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आंदोलन दडपण्याच्या हेतूने बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच गुरुवारी (ता.18) रात्री अटक केली आहे. तर मी गुन्हाच केला नाही तर मला अटक कशासाठी असा सवाल त्यांनी अटक करायला आलेल्या पोलिसांना विचारला आहे.

19 जानेवारी रोजी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई , गुजरात जाणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाड्या रोखू असा इशारा तुपकरांनी दिला होता. त्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. मात्र तुपकर हे आपल्या आंदोलनावर ठाम होते. दरम्यान तुपकर हे काल रात्रीपासून भूमिगत झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी पहाटेपासून त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुपकर हे गाडी बदलून मलकापूरकडे जात असताना राजुर घाटात पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे व तिथून त्यांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.

एल्गार मोर्चा, विधान भवनावर मोर्चा, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट अद्यापही यावर तोडगा निघत नसल्याने रविकांत तुपकर यांनी आता रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. 19 जानेवारी रोजी मुंबई, गुजरातकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रोखू, असा इशारा दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव लोहमार्ग पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे रात्रीपासून पोलिस तुपकरांचा शोध सुरू होता.

तुपकरांची रात्र पोलीस ठाण्यातच!

दरम्यान, रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आले असून त्यांचा आजच्या रात्रीचा मुक्काम हा पोलीस ठाण्यातच होणार आहे. पोलीस कोठडीमध्ये सध्या ते असून उद्या सकाळी त्यांना न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र आपले आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा त्यांनी निषेध केला आहे. आपण गुन्हाच केला नाहीतर अटक कशासाठी असा सवाल त्यांनी अटक करायला आलेल्या पोलिसांना केला आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न...

सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई मागणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा असेल तर असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, ही भूमिका यापूर्वीच मी जाहीर केलेली आहे, असे रविकांत तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत.

शिवाय आता लोकसभा तोंडावर आहेत आणि मी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभेची उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोणते ना कोणते कारण पुढे करून तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार असे सांगून मला किमान वर्षभर जेलमध्ये डांबून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु काहीही झाले तरी मी घाबरणार नाही, शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असाच सुरू राहणार आहे, मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Buldhana News : Ravikant Tupkar
Buldhana : रेल रोको, पोलिसांची नोटीस अन् रविकांत तुपकर झाले अचानक भूमिगत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com