रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनादरम्यान झाली होती जाळपोळ व तोडफोड…

जर न्यायालयाने जामीन दिला नाही तर तुपकर Ravikant Tupkar दांपत्यासह कार्यकर्त्यांची जेलमध्ये Jail रवानगी होणार आहे.
Ravikant Tupkar, Sharvari Tupkar and Party Workers
Ravikant Tupkar, Sharvari Tupkar and Party WorkersSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर आणि कार्यकर्त्यांना बुलडाणा पोलिसांनी आज अटक केली. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये काही कलम अजामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा, यासाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. नागपुरातील संविधान चौकात त्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याच रात्री पोलिसांनी त्यांना अटक करून रातोरात बुलडाणा पोलिसांच्या हवाली केले होते. तेथेही त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड व जाळपोळ केली. तेव्हा रविकांत तुपकर त्यांच्या पत्नी शर्वरी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

तुपकरांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली होती. तेव्हा तहसीलदारांची गाडी जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. या प्रकरणी रविकांत तुपकर, त्यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, आकाश माळोदे, भागवत सुसर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणात आज या सर्वांना बुलडाणा पोलिसांनी अटक केली आहे.

Ravikant Tupkar, Sharvari Tupkar and Party Workers
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

आज दुपारी रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत. सदर गुन्ह्यातील काही कलम हे अजामीनपात्र असल्याने न्यायालय त्यांना जमीन देते की नाही, यावर लक्ष लागून आहे. जर न्यायालयाने जामीन दिला नाही तर तुपकर दांपत्यासह कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com