Gondia Congress Dispute : निडणुकीपूर्वी अंतर्गत कलह पोहोचला शिगेला

Protest Within Party : गोंदिया जिल्हाध्यक्षाविरोधात अनेकांनी पुकारला एल्गार
Congress in Gondia.
Congress in Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Gondia Congress Dispute : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढील पंधरा दिवसात केव्हाही होऊ शकते. मात्र काँग्रेसला भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार अद्यापही निवडता आलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर मोर्चेबांधणी करण्याची गरज असताना गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीअंतर्गत कलह निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर पक्षातील काही ज्येष्ठ नेते नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्हाध्यक्ष हटावचा नारा दिला जात आहे. जिल्हाध्यक्ष मात्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा पक्षांतर्गत कलह चांगलाच महागात पडेल, अशी चर्चा आता गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीकडून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांचा काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे दौरा होता. यानिमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पदाधिकारी मेळावा, हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंसह माजी आमदार सतीश चतुर्वेदी सहभागी झाले. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली. ही बाब जिल्ह्यातील नेत्यासह राज्यातील नेत्यांना अंतर्गत कलह जाणवून देणारी ठरली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress in Gondia.
Gondia Ajit Pawar News : 9 महिन्यांनंतर आमदार पुत्राची घरवापसी, राजकीय विश्लेषकही चक्रावले !

यानंतर गोंदिया जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेला मतभेद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्याला अनुपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेश कार्यकारिणीचे सचिव पी. जी. कटरे, अमर वराडे, विनोद जैन, पुरुषोत्तम कटरे, झामसिंह बघेले, जितेंद्र कटरे, डॉ. विवेक मेंढे, चंद्रशेखर गुड्डू बोपचे, माणिक बिसेन, राजीव ठकरेले, राजेश नंदागवळी, सूर्यप्रकाश भगत, अनिता मुनेश्वर, जीवन शरणागत, इंद्रजीत गणवीर, आनंद लांजेवार यांचा समावेश आहे. आता याच लोकांनी काँग्रेसच्या गोंदिया जिल्हाध्यक्षांविरोधात एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष हटाव मोहीम आता गोंदिया सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याला कारणही तसेच आहे.

गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्याकडून सापत्न वागणूक देत जुन्या व वरिष्ठ कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षांवर करण्यात आला होता. काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्षांच्या विरोधात बंड पुकारले होते. काहींनी आपल्या पदाचे राजीनामेसुद्धा दिले. प्रदेश काँग्रेस कमिटीकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असताना याप्रकरणाला थंड करण्याच्या दृष्टीकोणातून कोणत्याही विशेष हालचाली अद्याप झालेल्या नाहीत. प्रकरण तसेच लांबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागली आहे. तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आता लोकसभेपूर्वी गोंदियात अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे समोर येऊ लागले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीहे प्रकरण शांत केले नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याचे मोठे नुकसान भोगावे लागेल, असे बोलले जात

Edited By : Prasannaa Jakate

Congress in Gondia.
Gondia Bridge Controversy : दोन आमदारांनी केले भूमिपूजन, तरी गावकऱ्यांवर आली अर्ध जलसमाधी घेण्याची वेळ !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com