Ahmednagar News: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि गोळीबारामुळे संतप्त झालेला मराठा समाज राज्यभर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू झालेल्या या संघर्षात सर्वच विरोधीपक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत.
यात एसटी महामंडळाच्या बसेसची जाळपोळ आणि तोडफोड होण्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी नगर जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोतून बसेस सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एस.टी.सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, नगर शहरातून पुण्याकडे जाणारा प्रवासी वर्ग मोठा असल्याने आणि बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने तीन बसेस पोलीस बंदोबस्तात पुण्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
याबाबत रविवारी 'सरकारनामा'ने बातमी प्रसारित करून पुणे-औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी लूट सुरू असून प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त दिले होते. याबाबत जिल्हा नियंत्रक मनीषा सकपाळ यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली होती. त्यानंतर नगरच्या तारकपूर आगारातून पुण्यासाठी तीन बसेस सोडण्यात आल्या.
सोडण्यात आलेल्या तीनही बसेस नगर पोलीस संरक्षणात पुणे हद्दीत शिरूर पर्यंत सोडण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात मराठा आंदोलनाबाबत सामान्य परस्थिती असल्याची माहिती आहे. पुण्यासाठी बसेस सोडण्यात येत असल्याने प्रवाशांनी जिल्हा नियंत्रक मनीषा सकपाळ यांचे आभार मानले. मात्र, जिल्ह्यातील इतर सर्व डेपो पोलिसांच्या सुचनेमुळे बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
Edited By - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.