Question of Congress workers : तुमच्या निवडणुकीत ‘हात’ हातात घेता, मग आमच्या निवडणुकीत का भांडता?

Ravi Bhavan Nagpur : काँग्रेसच्या संवाद यात्रेसाठी नुकतीच रविभवन येथे बैठक घेण्यात आली.
Congress, Nagpur.
Congress, Nagpur.Sarkarnama

Nagpur Political News : लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ आली की हातात हात घेता, मग महापालिकेच्या निवडणुकीत का भांडता, असा सवाल उपस्थित करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या संवाद यात्रेनिमित्त एकत्रित आलेल्या नेत्यांच्या प्रामाणिकपणावर शंका व्यक्त केली. (Expressed doubts about the sincerity of the leaders who came together)

काँग्रेसच्या संवाद यात्रेसाठी नुकतीच रविभवन येथे बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी ऊर्जामंत्री व पालकमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक आदी नेते उपस्थित होते.

सर्वांनी हातात हात घालून काँग्रेसच्या विजयाचा संकल्प सोडला. त्यामुळे कार्यकर्ते तात्पुरते सुखावले असले तरी नेत्यांची ही वज्रमूठ किती दिवस कायम राहील, याविषयी साशंक आहेत. यासंदर्भात कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता, नेत्यांचा इगो आणि मतभेदामुळे काँग्रेस डबघाईस आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ आली की हे नेते आपसातील मतभेद विसरतात. वादाचे मुद्दे बाजूला सारतात. मात्र कार्यकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाची असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कोणीच तडजोड करीत नाही. मतदान होईस्तोवर भांडतात. एवढेच नव्हे तर एकमेकांचे कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांचाही ‘बंदोबस्त’ करतात.

Congress, Nagpur.
Nagpur Congress News : ‘भारत जोडो’त जे झाले नाही, ते आता नागपुरात घडले; दिग्गज कॉंग्रेस नेत्यांचे हातात हात !

शहर अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचा महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यासाठी कोणी कोणी पडद्यामागून काम केले हे लपून राहिलेले नाही. त्यावेळी तिकीट वाटपावरून प्रचंड मतभेद निर्माण झाले होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकण्यात आली होती. त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसला.

महापालिकेच्या निवडणुकीत फक्त २८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एकाही नेत्याने माघार घेतली नाही. समझोता केला नाही. परस्परविरोधी कार्यक्रम राबवले. एकमेकांचे तोंडही या नेत्यांनी मागील चार वर्षांत बघितले नाही. आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे संवाद यात्रेच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला झाडून सर्वच नेते हजर झाले.

Congress, Nagpur.
Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

एवढेच नव्हे तर एकमेकांच्या हातात हात घातला. आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत असे दर्शवले. स्वतःची निवडणूक (Election) आटोपल्यानंतर नेत्यांनी अशीच एकजूट दाखवली आणि महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीत प्रामाणिकपणे सहकार्य केले तर निवडणूक जिंकणे काँग्रेसला (Congress) अवघड नसल्याचेही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com