Ayodhya Ram Mandir : रामाचा त्याग करणाऱ्यांना जनताच बाजूला टाकेल

Radhakrishna Vikhe Patil : महसूलमंत्र्यांची अकोल्यातून विरोधकांवर टीका
Radhakrishna Vikhe-Patil, Soniya Gandhi & Mallikarjun Kharge.
Radhakrishna Vikhe-Patil, Soniya Gandhi & Mallikarjun Kharge.Sarkarnama
Published on
Updated on

Akola : अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राम मंदिराच्या सोहळ्यावरून सत्ताधारी विरोधकांवर टीका करीत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या विषयावरून अकोला येथे काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेसला रामजन्मभूमीच्या सोहळ्याची भूमिकाच मान्य नाही. रामाला विरोध करणाऱ्यांना जनता खड्यासारखे उचलून बाजूला टाकेल, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेसने आदरपूर्वक नाकारले आहे.

Radhakrishna Vikhe-Patil, Soniya Gandhi & Mallikarjun Kharge.
Akola : बंजारा समाजाचे आंदोलन अन् राधाकृष्ण विखे-पाटलांचा गनिमी कावा...

10 जानेवारीला काँग्रेसने एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीररंजन चौधरी हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. यावरून आता राजकारण तापले असून सत्ताधारी विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. बुधवारी (ता. 17) महसूलमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 15 वर्षे सत्तेमध्ये असताना जनतेच्या भावनेचा अयोध्या येथील राम मंदिराचा मुद्दा मार्गी लावला नाही. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला आहे. सर्वांचे यामध्ये योगदान आहे. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये निकाल दिला तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य नाही? का असा सवाल विखे पाटील यांनी केला. ते म्हणाले अनेक कारसेवक, रामभक्त यांनी आपले संपूर्ण जीवन मंदिरासाठी समर्पित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्या येथील मंदिराचे आंदोलन ऐतिहासिक असेच आहे. या सगळ्यांच्या विचार न करता त्यावर मुक्ताफळे उधळणारी मंडळी देशात आहे. त्यांना श्रीराम मंदिराची भूमिकाच मान्य नाही. म्हणून हे विरोध करीत आहेत. जनता त्यांना खड्यासारखे उचलून बाजूला टाकल्याशिवाय राहणार नाही, असा टोला ही विखे-पाटील यांनी विरोधकांना लगावला.

पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलणे टाळले. आव्हाड यांची भूमिका त्यांच्या पक्षाला पटते का? त्यांना ती भूमिका आणि वक्तव्ये मान्य आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आव्हाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते मान्य असेल तर त्यांनी तसे जाहीर हवे, असेही विखे-पाटील म्हणाले. शिर्डी लोकसभेच्या जागेवर रामदास आठवले यांनी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलताना याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे नमूद केले.

Radhakrishna Vikhe-Patil, Soniya Gandhi & Mallikarjun Kharge.
Akola Shiv Sena : मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, कोण म्हणालं असं...

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी मोर्चापासून परावृत्त झाले पाहिजे आणि लोकांनाही परावृत्त केले पाहिजे. सरकारला आपले काम करू दिल पाहिजे. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Radhakrishna Vikhe-Patil, Soniya Gandhi & Mallikarjun Kharge.
Akola : दंगल, आरोप आणि मोर्चानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com