Congress News : अखेर राहुल गांधी पांडे कुटुंबाला भेटले, 25 लाखांचा चेकही दिला!; काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi Meets Krishnakumar Pandeys Family In Nagpur : नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी आलेल्या राहुल गांधींनी अखेर पांडे कुटुंबीयांचे भेट घेतली...
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress Rally Nagpur News : कृष्णकुमार पांडे यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झाले होते. त्यांच्या परिवाराला प्रदेश काँग्रेसने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली नाही. त्यामुळे पांडे परिवाराने आज माध्यमांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर राहुल गांधींनी पांडे कुटुंबीयांची भेट घेतली.

Rahul Gandhi
Nagpur Congress Rally : राहुल गांधींचा दावा.. भाजपचे खासदारच सांगतात...

पांडे परिवाराने नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रसार माध्यमांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी चौकशी करतो, असे सांगत पटोले यांनी फारसे भाष्य करणे टाळले. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही याबाबत अधिक प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाने जाहीर केले आहे तर, पांडे परिवाराला नक्कीच मदत मिळेल, असेही अतुल लोंढे म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नोव्हेंबर 2022 मध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाले होते. नांदेडमध्ये पांडे यांच्या पार्थिवावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी राहुल गांधी जेव्हा नागपुरात येतील तेव्हा पांडे कुटुंबीयांची भेट घेणार, असे जाहीर करण्यात आले होते. यामुळे आज ते येतील का आणि पांडे कुटुंबाला भेटतील का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण हा प्रश्न पांडे कुटुंबाकडूनच उपस्थित करण्यात आला होता. कृष्णकुमार पांडे यांचे 98 वर्षांचे वडील आतुरतेने राहुल गांधींची वाट पाहत होते.

जिथे काँग्रेसची सभा झाली, त्याच ठिकाणी राहुल गांधी यांनी व्यासपीठाच्या पाठीमागे पांडे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच आपला शब्द पाळला. इतकेच नाही तर पांडे कुटुंबीयांना 25 लाखांचा मदतीचा चेकही राहुल गांधी यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

edited by sachin fulpagare

Rahul Gandhi
Rahul Gandhi News : 'आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू' भरसभेत राहुल गांधी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com