Rahul Gandhi News : 'आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू' भरसभेत राहुल गांधी...

Congress Foundation Day : पुर्वी राजे आदेश द्यायचे आता त्याच प्रमाणे वरून भाजपचे वरिष्ठ आदेश देतात
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News :Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur : काँग्रेसची नागपूरमध्ये भव्य सभा आज ( गुरुवार) झाली. या सभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टिका केली. मोदींनी समोर मोकळेपणाने त्यांच्याच पक्षात खासदार बोलू शकत नाही, असे म्हणत भाजपचा एक खासदार आपल्याला संसदेत चोरून भेटला. या खासदाराने आपल्या मनाची झालेल्या अवस्थेविषयी भावना व्यक्त केल्या, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच आमचे सरकार येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू, असे आश्वासन देखील राहुल यांनी दिले.

Rahul Gandhi News :
Ajit Pawar : फास्ट गाडीचा अपघात होईल म्हणणारे अजितदादा आता त्याच गाडीसोबत....

अनेक खासदार काँग्रेस पक्षात होते नंतर ते भाजपमध्ये गेले. अशाच भाजपमध्ये गेलेल्या एका खासदाराच्या अनुभवा विषयी राहुल गांधी यांनी सांगितले. तो खासदार आपल्याला म्हणाला मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी विचारले काय बोलायचे आहे म्हणून. तुम्ही भाजपमध्ये आहात तुम्हाला काही टेन्शन आहे का? त्यावर तो खासदार म्हणाला, भाजपमध्ये राहून सहन होत नाही. मी भाजपमध्ये आहे पण माझं मन काँग्रेसमध्ये आहे.

भाजपची कार्यसंस्कृती राजाप्रमाणे आहे. पुर्वी राजे आदेश द्यायचे. आता त्याच प्रमाणे वरून भाजपचे वरिष्ठ आदेश देतात आणि कोणतही कारण न देता सगळ्यांना तो आदेश पाळावा लागतो. काँग्रेसमध्ये सगळ्यांना बोलण्याचा विचार मांडण्याचा अधिकारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही लोकांना केंद्रस्थानी ठेवून कायदे केले. लोकांच्या हिताचा विचार केला, असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील आपल्या भाषणातून नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. मोदींची वृत्ती ही खोटं बोला पण रेटून बोला, अशी आहे. त्यामुळे जनतेने सतर्क होण्याची गरज आहे. मोदी शहा यांना थांबण्याची हिंमत फक्त काँग्रेसमध्ये असल्याचे देखील खर्गे यानी ठणकावून सांगितले.

Rahul Gandhi News :
Self Immolation Incident : अशा घटनांमुळे सोलापूरला नेते येण्याचे प्रमाण कमी होईल; चंद्रकांतदादांनी व्यक्त केली भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com