Rahul Gandhi News : राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अन् प्रायश्चित्त घ्यावं !

Gujrat : सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.
Sunil Mendhe and Rahul Gandhi
Sunil Mendhe and Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur - Gondia District's Mp Sunil Mendhe News : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे गुजरातमधील सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यावरून देशभर गदारोळ सुरू झाला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी भाजपच्या तर भाजप नेत्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात आंदोलनाचा धुरळा उठवला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी घटनेनुसार रद्द झाली असून यात कोणतेही राजकारण नाही, असे परखड मत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे. ओबीसी नेते मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी व्यक्तिगत टिका केली होती. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

घटनेनुसार दोन वर्षापेक्षा जास्त काळाची शिक्षा असल्यास खासदारकी रद्द होते. असल्याने राहुल गांधी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे, असे खासदार सुनील मेंढे म्हटले आहे. देशाला पहिल्यांदाच मोदींच्या रूपात ओबीसी चेहरा पंतप्रधान म्हणून मिळालेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने ओबीसी समाजासाठी काम केले, ते मोठे आहे.

आधी ओबीसी आयोगाला कायदेशीर घटनेची मान्यता नव्हती, ती मोदींनी दिली. अशी अनेक कामे त्यांनी ओबीसी म्हणून समाजासाठी केलेले आहे. कांगावा करत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी व्यक्तिगत टिका केल्या होत्या मोदी चोर है, असे म्हणत पंतप्रधानांचे नाव घेतले होते आणि इतरही बडबड केली होती. आमच्या कार्यकर्त्याने याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) दोषी आढळले.

Sunil Mendhe and Rahul Gandhi
Vande Bharat Expressला भंडाऱ्यात थांबा मिळणार का? खासदार सुनील मेंढे म्हणाले…

घटनेप्रमाणे खासदाराला दोन वर्षासाठी शिक्षा ठोठावली असेल, तर त्यांचे निलंबन होते. राजकीय दृष्ट्य़ा त्यांचे निलंबन झाले आहे. यामध्ये राजकारण (Politics) अजिबात नाही. त्यांनी ओबीसींची (OBC) माफी मागायला पाहिजे. व्यक्तिगत आरोप त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. आता त्यांनी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त त्यांनी घ्यायला हवे, असेही खासदार मेंढे (Sunil Mendhe) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com