Ajit Pawar : फास्ट गाडीचा अपघात होईल म्हणणारे अजितदादा आता त्याच गाडीसोबत....

Political News : बारामतीच्या करेक्ट कार्यक्रमावरून दादांनी चंद्रशेखर बावनकुळेंना सुनावले होते
Ajit Pawar, Chnadrshekhar Bawankule
Ajit Pawar, Chnadrshekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही... सातत्याने कानावर पडणाऱ्या या वाक्याचाही आता चोथा झाला आहे. 2019 पासूनच्या घडामोडी पाहता तसा समज बळकट झाला आहे. रात्रीच्या प्रवासावरून तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आमदारांचे कान टोचले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी फास्ट चालली आहे. फास्ट गाडीचा कधी अपघात होईल हे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले होते. आता अजितदादाच त्या फास्ट गाडीत बसले आहेत.

रात्रीचा प्रवास धोकादायक असतो. त्यामुळे आमदारांनी रात्री प्रवास करून नये, असे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सभागृहात सांगत होते. काही वर्षांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचा रात्रीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाला होता.

आमदार जयकुमार गोरे आणि धनंजय मुंडे हेही रात्रीच्या प्रवासाला निघाल्याचे अजितदादांच्या लक्षात आले होते. शहाणपणा दाखवा, रात्री बारा ते पहाटे तीनदरम्यान प्रवास करू नका, असे त्यांनी त्या दोघांना सुनावले होते. त्यामुळे जयकुमार गोरे आणि धनंजय मुंडे यांनी रात्रीचा प्रवास टाळला, असे अजितदादांनी सभागृहात सांगितले होते. पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांनी युती सरकारच्या काही मंत्र्यांचे वाभाडे काढले होते.

Ajit Pawar, Chnadrshekhar Bawankule
Solapur DP Fund : सोलापूरला पुढील वर्षी 111 कोटी जादा निधी मिळणार?; विकास आराखडा वाढणार

बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. बारामतीबाबत भाजप नेत्यांकडून सातत्याने असे बोलले जायचे. यामागे निवडणुकीच्या काळात शरद पवार यांना बारामतीततच रोखून धरण्याचा एक उद्देश असतो. शरद पवार यांना भाजप मात देऊ शकते, असेही त्यातून सूचित करायचे असते. आता मात्र ही भाजपची ही भाषा बदलली आहे.

आता राष्ट्रवादीत काही राहिले नाही, अशा आशयाची टीका भाजपकडून केली जात आहे, कारण आता अजितदादा पवार आणि त्यांचे जवळपास 40 आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. खुद्द अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादांना आपल्यासोबत घेतल्यामुळे बारामतीत घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असेही कदाचित भाजपला वाटत असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankaule) यांच्या टीकेवर त्यावेळी म्हणजे विरोधी पक्षनेते असताना अजितदादा पवार यांनी कठोर टीका केली होती. बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार या बावनकुळे यांच्या वाक्याचा समाचार घेताना अजितदादा म्हणाले होते, त्यांना म्हणावं की जरा दमानं घ्या. त्यांची गाडी एकदम फास्ट चालली आहे. फास्ट गाडीचा कधी अपघात होईल, ती कधी कोलमडून पडेल, हे कळायचं नाही. अजितदादा त्यावेळी असे म्हणाले होते खरे, मात्र आता तेच त्या फास्ट गाडीत बसले आहेत. आता अपघात होईल की नाही, आणि झाला तरी कुणाचे नुकसान होईल, हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीनंतर कळेल. तसेही एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातील अंदाजाने महायुतीची चिंता वाढवून ठेवली आहे.

बावनकुळेंना उत्तर देताना फास्ट गाडीला कधीही अपघात होऊ शकतो, असे सांगत त्याला जोडूनच अजितदादांनी आमदारांना रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. आपण कितीही जागे राहिलो तरी ड्रायव्हरला कधी डुलकी लागेल, हे कळतही नाही, असे अजितदादा म्हणाले होते.

Edited by : Sachin Waghmare

Ajit Pawar, Chnadrshekhar Bawankule
Sharad Pawar on AjitPawar : अजितदादांना पक्षसंघटनेत काम करायचं आहे..? शरद पवार म्हणतात 'राष्ट्रवादीत मी एकटा निर्णय घेत नाही...'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com