राहुल गांधींचा अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम; १६ नोव्हेंबरला होणार आगमन...

१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रा बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. शेगाव येथे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होणार असून, सभेला पाच लाखांवर नागरिक हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राहुल गांधींचा अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम; १६ नोव्हेंबरला होणार आगमन...
Published on: 
Updated on: 

अकोलाः भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Mp Rahul Gandhi) अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम करणार आहेत. भारत जाेडाे यात्रेचे १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आगमन होणार असून, यात्रा जिल्ह्यातून ४५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात्रेत खासदार गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह १६ विविध संघटनांचा प्रस्ताव असल्याची माहिती काँग्रेसतर्फे काल आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या पत्रकार परिषदेला माजी राज्मंत्री प्रा. अजहर हुसेन व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी संबोधित केले. यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे, युवक काँग्रेसचे (Youth Congress) प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनीही माहिती दिली. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात (Maharashtra) ७ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. ही यात्रा अकोला (Akola) जिल्ह्यात पातूर येथे १६ नोव्हेंबर रोजी येणार आहे.

महिलांसह विविध संघटना होणार सहभागी

भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ईपीएस ९५ पेन्शनधारक समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्यार्थी संघटना, एकल महिला संघटना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसह अन्य संघटनांचे प्रस्ताव आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती व संघटनांचाही प्रस्ताव येत आहे. यात्रेत मेधा पाटकर यांच्या टिमधून ५०० महिला यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे यांनी दिली.

असा असेल मार्ग

भारत जोडो यात्रा १६ नोव्हेंबर रोजी रात्री पातूर तालुक्यात येणार आहे. ता. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून यात्रा बाळापूरकडे रवाना होईल. दुपारी ३.३० वाजता हिंगणा उजाडे येथे आगमन होणार आहे. त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रा बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. शेगाव येथे खासदार राहुल गांधी यांची सभा होणार असून, सभेला पाच लाखांवर नागरिक हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राहुल गांधींचा अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम; १६ नोव्हेंबरला होणार आगमन...
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी चढले बसच्या टपावर, व्हिडीओ तूफान व्हायरल!

तीन जिल्ह्यांतील पोलिसांचा राहणार बंदोबस्त

खासदार राहुल गांधी यांच्या अकोला जिल्ह्यातील आगमणप्रसंगी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता तीन जिल्ह्यातील पोलिसांचा बंदोबस्त यात्रेदरम्यान राहणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com