Prakash Ambedkar : "राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाका", प्रकाश आंबेडकरांनी का केली शिंदे सरकारकडे मागणी?

Prakash Ambedkar On Shivsena : प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं म्हटलं आहे. यासाठी स्ट्राईक रेटचा संदर्भ प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
prakash ambedkar raj thackeray.jpg
prakash ambedkar raj thackeray.jpgsarkarnama
Published on
Updated on

बाहेरून आलेल्यांवर राज्य सरकारचा पैसा खर्च होतो, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला आहे.

"राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांवर टाडा लागला पाहिजे," अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे सरकारकडे केली आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

राज ठाकरे काय म्हणाले?

"बाहेरून मुले येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकावतात. आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षण घेतात. आपल्या मुला-मुलींना शिक्षण मिळत नाही. ठाणे, पुणे, नागपूर येथे विकासकामे होत आहेत. ही विकासकामे आपल्या येथील नाहीतर बाहेरील येणाऱ्यांसाठी होत आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात राज्यात येत आहे. मग ते शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो," असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी म्हटलं होते.

prakash ambedkar raj thackeray.jpg
Prakash Ambedkar : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, स्ट्राईक रेट सांगत प्रकाश आंबेडकरांनी केलं विश्लेषण

यावर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटलं, "राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांवर टाडा लागला पाहिजे. सरकारने अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. समाज दुभंगण्यासाठी ही वक्तव्ये केली जात आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो."

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचं म्हटलं आहे. "एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणुकीचा स्ट्राईक रेट पाहिला, तर शिंदे यांचा 'स्ट्राईक रेट' डबल आहे. याचा सरळ अर्थ असा की, शिवसेनेची मते फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. एकनाथ शिंदे यांनाच शिवसैनिक खरी शिवसेना मानतो," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

prakash ambedkar raj thackeray.jpg
Shivsena UBT Vs VBA : ...म्हणूनच ते राजकारणात 'वंचित' राहिले, आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर ठाकरे गटाची बोचरी टीका

"उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईकरेट आरक्षणवादी आणि मुस्लिम मतदारांमुळे वाढला आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षाचे मतदान नाहीत. उद्धव ठाकरे यांचा मतदार दूर गेला आहे, हे काँग्रेस मांडत नाही. काँग्रेसला कणा असता, तर हे वास्तव मांडलं असते. मात्र, काँग्रेसचा कुणीही नेता हे मांडायला तयार नाही," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टीका केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com