Rajendra Jain: भुजबळांना ओव्हरटेक करुन राज्यसभेचा अर्ज भरणाऱ्या राजेंद्र जैन यांनी स्पष्ट केली भूमिका; राष्ट्रवादीतल्या सुप्त संघर्षावरही केलं भाष्य

Rajendra Jain:सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र जैन माध्यमांशी बोलत होते.
Chhagan Bhujbal_Praful Patel_Rajendra Jain
Chhagan Bhujbal_Praful Patel_Rajendra Jain
Published on
Updated on

Rajendra Jain: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांना टेकओव्हर करुन प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली. हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी राष्ट्रवादीतल्या सुप्त संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं.

Chhagan Bhujbal_Praful Patel_Rajendra Jain
Sharad Pawar on Bhujbal: छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी डावललं! शरद पवारांनी केलं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राजेंद्र जैन म्हणाले की, "पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी चर्चा केली आणि माझं नाव निश्चित केलं. छगन भुजबळ हे माझ्या वडिलांसारखे आहेत बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. मी त्यांच्या मुलांसारखं काम करणार आहे, त्यामुळं आमच्यामध्ये नाराजीचा कुठलाही प्रश्न नाही. आमच्यामध्ये कुठलाही सुप्त संघर्ष नाही. हा विषय कुठून आला आम्हाला माहिती नाही.

Chhagan Bhujbal_Praful Patel_Rajendra Jain
Sharad Pawar on Bhujbal: छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी डावललं! शरद पवारांनी केलं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

सुप्त संघर्षावर भाष्य

सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आशिष शेलार, भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकमतानं निर्णय करुन मला उमेदवारी दिली, मी अर्ज दाखल केला. त्यामुळं मला तर वाटत नाही काही सुप्त संघर्ष आहे. लोकांना फक्त बोलायचं आहे तर ते बोलतात. पक्षानं माझ्यावर मोठी जबाबदारी दिली. दिल्ली, भंडारा, गोंदिया आणि मुंबईपर्यंत आपल्या क्षेत्राच्या आणि राज्याच्या विकासासाठी जे करता येईल ते मी करणार"

Chhagan Bhujbal_Praful Patel_Rajendra Jain
AI Usage Rules Supreme Court : AI च्या वापरावर निर्बंध येणार का? सुप्रीम कोर्टानं दिले महत्वाचे निर्देश

भुजबळांची संधी गेली

दरम्यान, छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी पक्षाकडं एक अट घातली, ही अट भाजपला मान्य नसल्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय बदलण्यात आला आणि त्याऐवजी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. भुजबळांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रीपद देण्यात यावं त्यानंतरच आपण राज्यसभेवर जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतली. इतर नेत्यांच्या कुटुंबातील लोकांना एकाच वेळी राज्यसभा, लोकसभा, राज्यात मंत्रीपदं आहेत मग माझ्यावरच अन्याय का? असा थेट सवाल त्यांनी पक्षाला विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com