Sharad Pawar on Bhujbal: छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी डावललं! शरद पवारांनी केलं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar reaction to Bhujbal being sidelined: छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरु होती, पण त्यांना डावलून आता राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issue
Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issueSarkarnama
Published on

Pawar on Bhujbal nomination decision: छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरु होती, पण त्यांना डावलून आता राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. यामागं बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पण आता भुजबळांना डावलण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यावर आपली भूमिका मांडली.

Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issue
AI Usage Rules Supreme Court : AI च्या वापरावर निर्बंध येणार का? सुप्रीम कोर्टानं दिले महत्वाचे निर्देश

भुजबळांना डावल्याचं कारण काय?

सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या बारामतीच्या जागेवर पोटनिवडणुकीत निवडून आल्यानं त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती.

पण त्यांनी यासाठी एक महत्वाची अट ठेवली होती, त्यानुसार, मला जर राज्यसभेवर घेत असाल तर आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रीपद द्यावं, अशी मागणी त्यांनी केली होती. सगळ्यांच्या पोराबाळांची सोय करण्यात आली आहे तर माझ्याबाबतच दुजाभाव का?

असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं उपस्थित केला होता. पण त्यांच्या मागणीला भाजपनं केराची टोपली दाखवल्यानं भुजबळांना राज्यातच मंत्रीपदी काय ठेवण्याचा आणि राज्यसभेवर इतर कोणाला तरी पाठवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली.

Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issue
Pune Youth Missing : जेवायला चाललोय म्हणाला.., अटल सेतूवर मध्यरात्री थरार! कार पुलावर, चालक समुद्रात; पुण्यातील युवक बेपत्ता

दरम्यान, भुजबळांना डावलण्यात आल्याच्या चर्चांवर खुद्द त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, भाजपकडं आम्ही प्रस्ताव मांडल्यानंतर शेवटचा एकद दिवस होता, त्यानंतर भाजपनं म्हटलं की, जेव्हा मंत्रीमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा त्यामध्ये समीर भुजबळ यांचा विचार करु, पण भाजपनं त्यांना मंत्रीमंडळात घेण्यास नकार दिला या वृत्तामध्ये तथ्य नाही.

राज्यसभेवर मला संधी दिली नाही यासाठी मी नाराज नाही. जसा इतरांना न्याय मिळालेला आहे म्हणजेच राज्यसभेवर, लोकसभेवर राज्यात मंत्री आहेत मुलंबाळं त्याप्रमाणं मी सुद्धा हा पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे तर मला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळं आता आज नाही तर उद्या ते होईल. मी कबड्डीचा खेळाडू आहे बुद्धिबळाचा खेळाडू नाही, असं उत्तर छनग भुजबळ यांनी सांगितलं.

Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issue
Project X Party Pune: 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीत आमदार-खासदारांची मुलं होती?; सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

भुजबळ नाराज असतील तर माहिती नाही. पण त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय आहे? जर ते दिल्लीला आले असते तर देशात मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना राज्यसभेवर डावलल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Chhagan Bhujbal Rajya Sabha issue
Tukaram Mundhe Drive : तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला अनोखा सलाम! डोक्यावर संविधान घेऊन कार्यकर्त्याची पदयात्रा

शरद पवार काय म्हणाले?

राज्यसभेवर घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना डावललं आहे, यावर शरद पवार म्हणाले की, "त्यांना डावललं की घेतलं हे ही मला माहिती नाही. कारण काल रात्री याबाबत निर्णय झाला, मी इथं आहे काल मी इचलकरंजीला गेलो होतो" म्हणजेच भुजबळांना राज्यसभेवर संधी द्यायला हवी किंवा नाही, याबाबत शरद पवारांनी कुठलंही भाष्य केलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com