Ramdas Athwale : रामदास आठवलेंना लोकसभेला हव्यात 10 जागा; राज्यात 'या' दोन जागांवर दावा

Loksabha Election 2024 : आगामी निवडणुका आरपीआय म्हणून पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे.
Ramdas Athavale News, Nanded
Ramdas Athavale News, NandedSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.याचदरम्यान, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालला आहे.एकीकडे भाजपकडून 26 जागांचा दावा केला जात असतानाच शिंदे गट आणि अजित पवार गटही लोकसभेसाठी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचवेळी आता राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देशात 10 तर राज्यात 2 जगांची मागणी केली आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची चर्चा सुरू केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात भाजप 26 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे 22 जागा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या साऱ्या वाटाघाटीत रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षला लोकसभेच्या जागा मिळणार का ? याबाबत आद्यप कोणी ही सूतोवाच केले नाही. त्यातच आठवले यांनी आता 10 जागांची मागणी केली आहे.

Ramdas Athavale News, Nanded
Ayodhya Ram Temple : काँग्रेस नेत्याचं राम मंदिरावरून वादग्रस्त विधान; म्हणाले...

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्या निमित्त अभिवादन करण्यासाठी आठवले आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वामध्ये जिंकणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणे हा आपला नववर्षाचा संकल्प असल्याचं आठवले यांनी सांगितले.

आगामी निवडणुका आरपीआय म्हणून पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. त्यासाठी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुका न लढता स्वतंत्र चिन्ह मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचे मनोदय देखील यावेळी त्यांनी सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यामध्ये नुकत्याच करण्यात आल्यास सर्वे दरम्यान महाविकास आघाडीला जास्त जागा तर महायुतीला कमी जागांवरती समाधान मानावे लागत आहे. याबाबत आठवले म्हणाले, ओपिनियन पोलमध्ये महायुतीला कमी जागा दाखवल्या. परंतु आम्ही 40 जागा जिंकणार आहोत. यापूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील सर्वे मध्ये कमी जागा दाखवण्यात आला मात्र निकाल वेगळे लागले, हे सर्वांनी पाहिले आहे. देशात निर्माण करण्यात आलेली इंडिया आघाडी ही विकासासाठी नसून फक्त मोदींना हरविण्यासाठी असल्याची टीका देखील आठवले यांनी केली.

सोलापूरच्या जागेची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोलापूर आणि शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघातील जागा द्यावी अशी मागणी अक्कलकोट आरपीआयच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांना तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ramdas Athavale News, Nanded
Ayodhya Ram Temple : काँग्रेस नेत्याचं राम मंदिरावरून वादग्रस्त विधान; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com