Kishore Gajbhiye : बंडखोरी फसली, किशोर गजभियेंचे डिपाॅझिट जप्त

Kishore Gajbhiye Ramtek Lok Sabha Constituency : सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेले किशोर गजभिये यांना खासदार व्हायचे होते. सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेले किशोर गजभिये यांचा राजकीय प्रवास रंजक आहे.
Kishore Gajbhiye
Kishore Gajbhiye sarkarnama

Lok Sabha Election 2024 ः रामटेक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले आणि उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. त्यांनी अवघी 24 हजार मतं मिळाली आहेत. त्यांना वंचित बहूजन आघाडीच्या पाठिंब्यानंतरही बसपाच्या हत्तीच्या पुढे जाता आले नाही.

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे विजयी झाले. त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांना पराभूत केले. या लढतीमध्ये बंडखोर किशोर गजभिये कुठेच दिसले नाही. त्यांना अवघी 24 हजार मतं मिळली.

सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेले किशोर गजभिये यांचा राजकीय प्रवास रंजक आहे. त्यांना आमदार व्हायचे होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात पदवीधर मतदारसंघातून ते लढले होते. त्यावेळी त्यांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे ठरवले.

बसपात प्रवेश घेऊन उत्तर नागगपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. गजभिये, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि भाजपचे डॉ. मिलिंद माने अशी तिरंगी लढत येथे रंगली होती. गजभिये यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास भाजपने हिरावून घेतला.

गजभिये आणि राऊत पराभूत झाले आणि माने विजयी झाले होते. बसपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे फार काही पटले नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले. राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवार केले होते. त्यावेळी त्यांनी 4 लाख 67 हजार 738 मते घेतली होती. मात्र विजयासाठी एक लाख २६ हजार मते कमी पडली. शिवसेनेचे कृपाल तुमाने येथून विजयी झाले होते.

Kishore Gajbhiye
Nilesh Rane On Rohit Pawar: ठाकरे गटाला जॅकपॉट तर रोहित पवार फार लहान; राणेंचा प्रहार

काँग्रेसचे Congress उमेदवार असतानाही त्यावेळी त्यांना सावनेरचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार तसेच नितीन राऊत यांनी उघडपणे विरोध केला होता. राऊत यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. मात्र एबी फॉर्म गजभिये यांच्याकडे होते. त्यामुळे राऊतांनी माघार घेतली. काँग्रेसच्या गजभिये यांचे व्हायचे तेच झाले होते. यावेळी पुन्हा आपल्याला उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा गजभिये यांची होती. मात्र केदार पुन्हा आडवे आले. त्यांनी परस्पर रश्मी बर्वे यांच्या नावची घोषणा केली.

जिल्हा काँग्रेस कमेटीत ठराव केला. त्यामुळे गजभिये यांनी बंडाचे निशान फडकावले. त्यांना केदारांचा वचपा काढायचा होता. सुरुवातीला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला. वंचितने त्यांचे नाव जाहीर केले. काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आपल्या नावाचा विचार होईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे वंचितने शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली.

मात्र गजभिये यांना उमेदवारी न देता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी काँग्रेसने दिली. वंचितने पुन्हा किशोर गजभिये यांना पाठींबा जाहीर केला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी रामटेक लोकसभा मतदारसंघात दोन जाहीसभासुद्धा घेतल्या होत्या. मात्र, गजभिये यांना अवघी 24 हजारच मते पडली. त्यांना डिपाॅझिट सुद्धा वाचवता आले नाही.

(Edited By Roshan More)

Kishore Gajbhiye
Eknath Shinde : तुम मुझको कब तक रोकोगे..., सेंट्रल हाॅलमध्ये मोदींसाठी मुख्यमंत्री शिंदेंची शेरो शायरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com