Raju Parve Vs ShyamKumar Barve: रामटेकमध्ये भगवा फडकणार की पंजा उमटणार?

Ramtek Lok Sabha Election Shivsena Raju Parve VS Congress ShyamKumar Barve: कधीकाळी रामटेक लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी पंतप्रधान झाला होता. पी.व्ही. नरसिंग राव हे रामटेकमधून निवडून आल्यानंतर पंतप्रधान झाले होते.
Raju Parve Vs ShyamKumar Barve
Raju Parve Vs ShyamKumar BarveSarkarnama

Ramtek Lok Sabha Constituency: ठाकरेंच्या शिलेदाराने मागील दोन टर्म बाण चालवलेल्या रामटेकमध्ये आता काँग्रेसचा पंजा उमटणार की शिंदेंचा धनुष्यबाणाचा आधार घेतलेले राजू पारवे विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून चर्चेचा ठरला आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे याचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावं लागलं.

बर्वेच्या विरोधात काँग्रेसचे (Congress) आमदार पण, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. पारवेंना उमेदवारी दिल्यानं सलग दोन टर्म खासदार राहिलेले कृपाल तुमाने नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे आता या निवडणुकीत तुमाने यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात नाराजी तर दिसरीकडे काँग्रेसने संविधान बचावचा दिलेला नारा, यामुळे या निवडणुकीत कोणाचं पारडं जड ठरणार आणि कोणाला फटका बसणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कधीकाळी रामटेक लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी पंतप्रधान झाला होता. पी.व्ही. नरसिंग राव हे रामटेकमधून निवडून आल्यानंतर पंतप्रधान झाले होते. गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नरसिंग राव, तेजसिंगराव भोसले, दत्ता मेघे, राणी चित्रलेखाताई भोसले यांच्यासह अनेक दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. रामटेक लोकसभा आणि काँग्रेस असे समीकरण बनले होते. मात्र, 1999 च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेने (Shivsena) रामटेकवर भगवा फडकविला.

सुबोध मोहिते शिवसेनेचे खासदार झाले. सुबोध मोहिते यांनी दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मधेच त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रकाश जाधव 2007 ते 2009 दरम्यान शिवसेनेचे खासदार राहिले. तर 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मुकुल वासनिक निवडून आले. कृपाल तुमाने यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमानेंनी या मतदारसंघावर सेनेचा भगवा फडकवला.

Raju Parve Vs ShyamKumar Barve
Latur Lok Sabha Constituency Analysis : विलासराव, निलंगेकर, चाकूरकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या लातूरकरांचा नवा खासदार कोण?

काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे वर्चस्व या मतदारसंघावर राहिले आहे. गेल्या तीन निवडणुकीत जातीय समीकरणं खूप महत्वाची ठरली आहेत. हिंदू विरुद्ध बौद्ध असा थेट सामना झाल्याने 2014 मध्ये मुकुल वासनिक तर 2019 मध्ये किशोर गजभिये यांचा पराभव झाला. 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. तर शिंदेच्या शिवसेनेने माजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली.

या निवडणुकीत काँग्रेसने संविधान बचावचा नारा दिल्यामुळे त्यांना विजयाची खात्री आहे. तर संघटनात्मक दृष्ट्या मजबूत असलेल्या भाजपने राजू पारवेंना मदत केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. मात्र रामटेकमधील जनता खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार हे उद्या स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com