Amravati Graduate Constituency Election: रणजीत पाटील-धिरज लिंगाडे यांच्यात होणार थेट लढत, प्रहारचा प्रभाव किती?

BJP : भाजपचे माजी मंत्री रणजीत पाटील व धीरज लिंगाडे यांच्यात लढत अटळ आहे.
Dhiraj Lingade, Ranjeet Patil and Bacchu Kadu
Dhiraj Lingade, Ranjeet Patil and Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Amravati Graduate Constituency Election : अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते धिरज लिंगाडे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता भाजपचे (BJP) माजी मंत्री रणजीत पाटील व धिरज लिंगाडे यांच्यात थेट लढत होणार असे मानले जात आहे. यंदा आमदार बच्चू कडूंची प्रहार मेस्मा संघटनेसोबत मैदानात उतरली आहे. पदवीधरच्या मैदानात पहिल्यांदा उतरलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) निवडणुकीवर किती प्रभाव टाकतात, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अमरावती (Amravati) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत (Election) किरण सरनाईक आश्चर्यकारकरीत्या निवडून आले होते. त्यांच्या विजयाची अपेक्षा कुणी केली नव्हती. पण मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीत क्रमांक एकवर राहून त्यांनी आश्‍चर्याचा धक्का दिला होता. क्रिकेट आणि राजकारणात (Politics) शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निकालाप्रमाणे पदवीधरचाही निकाल लागेल का, अशी चर्चा रंगली आहे. बच्चू कडू राज्यातील तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका यावेळी लढत आहे. अमरावती जिल्ह्यावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या एंट्रीने काय फरक पडेल, या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होऊ घातली आहे. भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांचे नाव निश्चित झाले असताना, शिवसेनेकडून इच्छुक असलेले धिरज लिंगाडे यांचे नाव काँग्रेसकडून निश्‍चित झाले असून बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना एकदिलाने साथ दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही कॉंग्रेस नेते त्यांना साथ देणार नाहीत, अशीही एक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी असताना शिवसेनेकडून धिरज लिंगाडे यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडून खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटासोबत गेले, शिंदे गट भाजपसोबत असल्याने ही जागा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित होते. त्यामुळे धिरज लिंगाडे हे मूळ शिवसेनेत कायम राहिले व तिकिटासाठी आग्रही राहिले. दरम्यान या जागेविषयी महाविकास आघाडीतच घोळ सुरू होता. आता ही जागा काँग्रेसला सुटली आहे. धिरज लिंगाडे यांनी यापूर्वी काँग्रेससोबतही संपर्क केला होता. सध्या शिवसेनेत असले तरी लिंगाडे यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना या जागेवर तिकीट देण्याचे निश्चित झाले आहे.

Dhiraj Lingade, Ranjeet Patil and Bacchu Kadu
Bachchu Kadu accident news : आमदार बच्चू कडू यांचा अपघात ; डोक्याला गंभीर दुखापत

मुळात लिंगाडे परिवार हा रामभाऊ लिंगाडेंपासून काँग्रेस विचारांचा राहिलेला आहे. पण मध्यंतरीच्या काळात धिरज लिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून काही काळ शिवसेना जिल्हाप्रमुख पद सांभाळलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे लिंगाडे कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांची लिंगाडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com