महाविकास आघाडी म्हणजे अमर, अकबर, अँथोनी; दानवेंनी डिवचले

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची महाविकास आघाडीवर टिका
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

बुलडाणा : शिवसेना 'अकबर' झाली आहे. शिवसेनेने (shivsena) आता गीतेच पठण करण्याऐवजी, नमाज पठणाचे वर्ग घ्यायला पाहिजेत, असा टोला भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेला लगावला.

Raosaheb Danve
'कायदा राबवायचा असेल तर...मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब'

आज दानवे बुलडाणा लोकसभा मतदार संघात भाजपच्या (BJP) आढावा बैठकीनंतर पत्रकारांची बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज महाविकस आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. हे अमर, अकबर, अँथोनी चे सरकार आहे. हे राज्यातील प्रश्नावर कधीच एकत्र बसत नाही. राज्याच्या हिताचा कोणताही विचार करत नाहीत, असा आरोपही दानवे यांनी केला. त्यामुळे यांना मी अमर, अकबर, अँथोनी म्हणतो, असे दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
उद्धव ठाकरे २ वर्षांनंतर मंत्रालयात! शरद पवार म्हणाले, "आले का, अरे व्वा"!

या अमर, अकबर, अँथोनीमध्ये शिवसेना कधीच अकबर झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेचे गीता पठण करण्याऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात सुरु झालेल्या लोडशेडिंगवरुनही दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, शिवाय राज्यात कोळशाच नियोजन या सरकारने योग्य पद्धतीने केले नसल्याने राज्यात अभूतपूर्व लोडशेडिंग सुरू झाले. यामुळे हे सरकारचेच अपयश, असल्याचेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com