मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जवळपास २ वर्षांनंतर मंत्रालयात दाखल झाले. कोरोना संसर्ग आणि त्यानंतर त्यांच्या मानेवरील शस्त्रक्रियामुळे मागच्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयात येवू शकले नव्हते. परिणामी उद्धव ठाकरे हे वर्षा या शासकीय निवासस्थानातून आणि सह्याद्री अतिथीगृहातून राज्याचे कामकाज चालवत होते. मात्र आज अनेक दिवसांनंतर अचानक कोणतीही पूर्वसुचना न देता ते मंत्रालयात आले, त्यामुळे पहिल्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली.
मंत्रालयात आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुले वाहून अभिवादन केले. याशिवाय पुराभिलेख संचालनालयातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लावण्यात आलेल्या एका प्रदर्शानाचीही उद्धवठाकरे यांनी पाहणी केली. तसेच मंत्रालयातील विविध विभागांना भेटी दिल्या आणि कामकाजाविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, बैठक घेतली आणि सूचनाही दिल्या.
याच बाबत शरद पवार (Sharad Pawar) यांना आज पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांच्या तोंडून अरे व्वा! असे उद्गार निघाले. ते पुढे म्हणाले, त्यांची तब्येत ठीक नव्हती. मी अनेक राज्यात बघितलेले आहे की मुख्यमंत्री घरी बसून निर्णय घेतात. घरी सचिवालय असते. आपल्या वर्षावर देखील तसे सचिवालय आहे. त्यामुळे ते मंत्रालयात आले आणि नाही आले तरी राज्याचा कारभार थांबत नाही. त्यांच्याकडील फाईल क्लिअर करतात, वेळेवर निर्णय देतात. त्याबद्दलची चिंता माझ्या मनात नाही. मध्यंतरी त्यांच्या आरोग्यमुळे मर्यादा होत्या, त्या कमी झालेल्या दिसतात. त्यामुळे ते आले याचा आनंद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.