'कायदा राबवायचा असेल तर...मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब'

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.
raju patil
raju patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ठाण्यातील उत्तरसभेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सभेपूर्वी राज ठाकरे यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार ठाकरे यांनी उंचावली. यावरुन नौपाडा पोलिस (Police) ठाण्यात त्यांच्यार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरून मनसे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

raju patil
...नाहीतर आम्हीही येऊरच्या बंगल्यातील गोष्टी बाहेर काढू : देशपांडेंचा आव्हाडांना इशारा

या संदर्भात राजू पाटील यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे? विचारांबरोबर धर्म पण बदलला काय? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब …!'' असा टोला त्यांनी लगावला आहे. नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन राजकारण रंगले आहे.

raju patil
प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षात यावं अन्‌ नेतृत्व करावं... आठवलेंचे आवाहन

दरम्यान, यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार उंचावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे यांनी उत्तरसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्योरोपांचे राजकारण रंगले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com