Akola Rape : क्रूरतेचा कळस! सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंडनही केले... ‘वंचित’चा पोलिस ठाण्यात ठिय्या

FIR Logged : खदान भागातील घटनेमुळे खळबळ, पोलिस बंदोबस्तात वाढ
Police Station Khadan Akola
Police Station Khadan AkolaGoogle
Published on
Updated on

Crime Under POCSO Act : शहरातील खदान भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणानं १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. शरीरावर अनेक ठिकाणी सिगारेटचे चटके देत युवकानं ब्लेडच्या साहाय्याने तिचे केसही कापले. एवढ्यावरच समाधान न झाल्यानं त्यानं तिला सलूनमध्ये नेत तिचे मुंडन करायला लावलं. पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ नेत बालिकेला सर्वांसमक्ष विवस्त्र करत बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेमुळं अकोला शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुलीची अवस्था पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीतील महिलांनी खदान पोलिस ठाण्यात ठिय्या दिला व आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. तणाव वाढल्यानं परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Police Station Khadan Akola
Udayanraje Bhosale : मनोज जरांगेंना उदयनराजे भोसलेंचे बळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं ?

गणेश कुंभरे (वय २९) असे आरोपीचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पीडित मुलीचे पालक मजुरी करतात. गणेशने पीडित मुलीला १५ नोव्हेंबरला मारहाण करीत आपल्या घरी नेले. मुलीला सिगारेटचे चटके देत त्यानं तिच्यावर अनेकदा बळजबरी केली. मुलीनं विरोध केल्यानं संतापाच्या भरात गणेशने ब्लेडच्या साह्यानं मुलीचे केसंही कापले. त्यानंतर त्याने तिला पुन्हा मारहाण केली. (Rape on Minor Girl in Akola City Tension Created As Vanchit Bahujan Aaghadi Protested Inside Police Station)

कुणाला कळेल या भीतीनं गणेशने पीडितेला सिंधी कॅम्पमधील एका सलूनमध्ये नेलं. घरात वाद झाल्यानं तिनेच केस कापून घेतले, त्यामुळे तिचं मुंडन करून देण्यास गणेशनं सलूनवाल्यास सांगितलं. मुंडन करून घेतल्यानंतर गणेशने तिला पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ आणलं व सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मारहाणही केली. या वेळी परिसरातील चार युवकांनी गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्यानं गणेश पळुन गेला. मात्र कुणालाही हा प्रकार सांगितल्यास परिवाराला जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी परतली. त्यावेळी तिच्या पालकांनी तिला या प्रकाराबद्दल विचारणा केली. तब्बल दोन दिवस ती भीतीपोटी रडत होती. गणेश परिवाराला मारून टाकेल, या दहशतीत ती होती. पालकांनी समजूत घातल्यानंतर अखेर पीडितेनं घडलेला प्रकार सांगितला.

मुलींच्या पालकांनी तातडीनं खदान पोलिस स्टेशन गाठत गणेशविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी पीडितेकडे पोहोचल्या. मुलीची अवस्था पाहिल्यावर साऱ्यांनाच संताप अनावर झाला. त्यामुळे या महिलांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं.

Police Station Khadan Akola
Sharad Pawar In Madha : शरद पवारांकडून माढ्यात रणजित शिंदे 'बेदखल'; करेक्ट कार्यक्रम होणार ?

शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरापर्यंत अरुधती शिरसाट, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, वंदना वासनिक, आशिष मांगुळकर, सचिन शिराळे आदी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे खदान भागातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी गणेशला तातडीनं बेड्या ठोकत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

Edited by : Prasannaa Jakate

Police Station Khadan Akola
Akola Shivsena : विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com