Ravikant Tupkar News : आंदोलनांच्या दणक्यामुळे मिळतेय शेतकऱ्यांना मदत !

Jail or Bail : जेल की बेल..? आज फैसला येणार
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

फहीम देशमुख

Political News : बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची मदत मंजूर झाली आहे, निवडणुकीच्या तोंडावर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, हे आपल्या आंदोलनाचे यश आहे. आंदोलनाच्या दणक्यामुळेच ही मदत मिळणार आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सावळी येथील मेळाव्यात सांगितले.

एल्गार परिवर्तन मेळाव्याच्या वेळी तरुणांनी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचे स्वागत करून बैलगाडीतून मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तुपकरांचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षण केले. त्यानंतर झालेल्या सभेत शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांची मोठी गर्दी होती.

या वेळी तुपकर म्हणाले, दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीची मदत मिळावी, यासाठी आपण वारंवार आंदोलने केली आहेत. एल्गार मोर्चानंतर मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनादरम्यान २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ यासह दुष्काळ, अवकाळी व गारपिटीची मदत यांसह इतर मागण्या आक्रमकपणे मांडल्या होत्या.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मदत देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आता बुलडाणा जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

शासनाकडून जाहीर झालेली मदत लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्याचे श्रेय रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाईल म्हणून ही मदत तातडीने जमा न करता आता निवडणुकीच्या तोंडावर जमा केली जात आहे. मात्र, या मदतीसाठी आम्ही केलेली आंदोलने जनता विसरली नाही.

त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नव्हते आणि आता श्रेय घेण्यासाठी काही जण पुढे येतील, पण जनतेला सर्व समजते, आता कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असा घणाघात तुपकरांनी केला.

तातडीने मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, त्याचबरोबर दुष्काळाची मदत व पीकविमाही तातडीने शेतकऱ्यांना द्या, तसेच सोयाबीन-कापसाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये बोनस द्या, अशी मागणीदेखील रविकांत तुपकरांनी या मेळाव्यादरम्यान केली. तर या मेळाव्याचे आयोजन सावळीच्या गावकऱ्यांसह हिंदूधर्मरक्षक ग्रुप सावळी व सुवर्ण गणेश मित्र मंडळाच्या युवकांनी केले होते.

जेल की बेल..? आज फैसला येणार !

बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने आज 21 फेब्रुवारी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. तुपकरांच्या राजकीय भविष्यावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. तुपकरांच्या जामिनावर निकाल काहीही लागला, तरी लोकसभा निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहोत. पोलिसांच्या दबावामुळे वेळप्रसंगी जेलमधून लोकसभा निवडणूक लढू, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकर यांना दिलेला जामीन रद्द करण्याबाबतचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.

७ व ८ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यानंतर १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीतदेखील या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल आज देणार आहे.

तुपकरांना तुरुंगात जावे लागणार.? की त्यांना जमीन मिळणार.., याचा फैसला आज होणार आहे. हा फैसला येण्यापूर्वी रविकांत तुपकरांनी सकाळी आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दुपारी ते न्यायालयात हजर होणार आहेत. आता नेमका या प्रकरणी काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Edited By : Atul Mehere

R

Ravikant Tupkar
Buldhana Politics : राजकारण तापले! तुपकर म्हणाले, कानाखाली आवाज काढण्याच्या पांचट धमकीकडे लक्ष देत नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com