Video Ravikant Tupkar : विधानसभेला उमेदवार उतरवणार, तुपकरांची मोठी घोषणा; पण स्वाभिमानी की दुसऱ्या पक्षातून?

Ravikant Tupkar On Assembly Election : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रीत झाल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही विधानसभेच्या मैदानात उतरणार आहोत, असं तुपकरांनी सांगितलं.
ravikant tupkar
ravikant tupkarsarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. बुलढाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रविकांत तुपकर यांनी घेतला आहे.

त्यासह लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता तुपकर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे.

रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) म्हणाले, "बुलढाणा लोकसभा निवडणुकीत काही फरकानं आमचा पराभव झाला आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते बुलढाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे."

"बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगार आणि जळगाव या सहा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार आहोत. 13 आणि 14 जुलैला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेणार आहोत. त्या बैठकीत महाराष्ट्रात कुठे-कुठे निवडणूक लढायची याचा निर्णय होईल," असं तुपकरांनी सांगितलं.

ravikant tupkar
Mahadev Jankar Big Announcement : आता माघार नाही...,जानकरांचं ठरलं; पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार!

"कुठल्याही आघाडीत जाण्याबाबत निर्णय झाला नाही. स्वतंत्रपणानं आम्ही तयारीला लागलो आहोत. प्रस्थापितांना आम्हाला शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रीत झाल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही विधानसभेच्या मैदानात उतरणार आहोत," असं तुपकरांनी म्हटलं.

ravikant tupkar
Congress Nana Patole : विधानसभेसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी नानांचे स्पष्टीकरण म्हणाले, यात काही गैर नाही !

"मी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली नाही. लोकसभा निवडणूक मी स्वतंत्र लढलो आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आमचे उमेदवार उतवणार आहोत. तसेच, मी स्वत:हा विधानसभा निवडणूक लढणार आहे," असं तुपकरांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com