Devendra Bhuyar: मोर्शी विधानसभा मतदारसंघात बंडखोर भुयारांनी वाढवले आमदार भुयार यांचे टेन्शन!

BJP NCP Official Candidates Rebellion: ...दोन्ही राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांना आता बंडखोरांचाही सामना करावा लागणार आहे.
Devendra Bhuyar
Devendra BhuyarSarkarnama
Published on
Updated on

Morshi Vidhansabha Constituency: मोर्शी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपने आपल्याकडे खेचून घेल्याने आधीच टेन्शन वाढलेले विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात आणखी एका शिवसेनेच्या बंडखोर भुयारांनी उमेदवारी दाखल करून त्यांच्या तणावात भर घातली आहे. यासोबतच काँग्रेसच्या(Congress) एका बड्या नेत्याच्या चिरंजीवानेसुद्धा बंडाचे निशाण फडकावले आहे.

देवेंद्र भुयार मोर्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतले. असे असले तरी भाजपने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. उमेश यावलकर यांची उमेदवारीसुद्धा जाहीर केली. त्यामुळे भुयारांसमोर अडचण निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

Devendra Bhuyar
Nana Patole : नाना पटोलेंनी बैलगाडीतून जात दाखल केला उमेदवारी अर्ज ; म्हणाले, 'ही तर..'

शरद पवार यांचे विश्वासू, अमरावती जिल्ह्याचे नेते हर्षवर्धन देशमुख यांना त्यांनी गळ घातली होती. मात्र शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गिरीश कराळे यांना एबी फॉर्म दिल्याने त्यांचा मार्ग बंद झाला होता. मग त्यांनी पुन्हा आपला मोर्चा अजित पवार यांच्याकडे वळवला.

शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देऊन अजित पवार यांनी भाजपसह महायुतीला धक्का दिला. भुयारांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शिवसेनेचे अमोल भुयार यांनी उमेदवारी दाखल करून त्यांची अडचण केली आहे. दुसरीकडे कराळे हे शरद पवार यांचे उमेदवार असल्याने देशमुखांची मदतही आता त्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Bhuyar
Mahayuti News : सिंदखेडराजामध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांमध्ये आपसातच जुंपली!

तर इकडे दोन्ही राष्ट्रवादी आपसात लढत असल्याने भाजप उमेदवाराला पोटात गुदगुदल्या होत होत्या. मात्र त्यांचा आनंद फारकाळ टिकला नाही. भाजपचे श्रीधर सोलव, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे उपप्रमुख अमित कुबडे आणि भाजपचे डॉ. मनोहर आंडे यांनीसुद्धा येथून बंड पुकारले आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार नरेश ठाकरे यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे यांनीसुद्धा उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे मोर्शी विधानसभा मतदारसंघात मोठी रंगत निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांना आता बंडखोरांचाही सामना करावा लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com