Mahayuti News : सिंदखेडराजामध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांमध्ये आपसातच जुंपली!

Mahayuti in Sindkhedraja Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana Mahayuti News : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष यांनीसुद्धा येथे बंड केले आहे.

महायुतीचेच तीन उमेदवारांना एकमेकांच्या विरोधात दावेदारी दाखल केल्याने यापैकी कोण माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे.

सिंदखेड राजाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासोबत अडीच वर्षे होते. शिंगणे यांच्या पुतणीलाच शरद पवारांनी निवडणुकीसाठी तयार केले होते. मात्र विधानसभेची निवडणूक जवळ येताच शिंगणे यांनी तुतारी हाती घेऊन घरातून होणारे बंड थोपवले.

Mahayuti News
Rajendra Mulak : माजीमंत्री राजेंद्र मुळकांच्या बंडाने रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाढली चिंता!

आता त्यांना अजित पवार आणि शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना कोड्यात टाकले आहे. ही जागा शिवसेनेकडे गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांना एबी फॉर्म दिला.

त्यांच्या नावाची घोषणासुद्धा शिवसेनेकडून करण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मनोज कायंदे यांच्या हातात एबी फॉर्म सोपवला. ते मूळचे काँग्रेसचे आहेत. पक्षात प्रवेश देऊन त्यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार केले आहे.

राजेंद्र शिंगणे आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या मतदारसंघावर दावा केला होता. ते शरद पवार यांच्याकडे जाता शिवसेना आणि भाजपने दावा करणे सुरू केले. शिवसेनेने खेडकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने अजित पवार यांना मतदारसंघावरचा दावा सोडाला असे दिसत होते.

मात्र आज अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का देत आपला उमेदवार दिला. यातच भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनीसुद्धा अपक्ष नामांकन अर्ज भरल्यामुळे महायुतीमध्ये आणखीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Mahayuti News
Nana Patole : नाना पटोलेंनी बैलगाडीतून जात दाखल केला उमेदवारी अर्ज ; म्हणाले, 'ही तर..'

शिवसेनचे (Shivsena) उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला एबी फॉर्म दिला असल्याने आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा करणे अचंबित टाकणारे आहे. या मागे खूप मोठे षडयंत्र असल्याचा आरोप खेडकरांचा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com