Chandrapur Lok Sabha Constituency: किंगमेकर डॉ. अशोक जीवतोडेंना मिळणार का खासदारकीचा राजयोग ?

Chandrapur Political News : डॉ.जीवतोडे हे भाजपचे विदर्भातील प्रमुख ओबीसी नेते आहेत.
Dr.Ashok Jivtode
Dr.Ashok JivtodeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Elections 2024: चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील जिल्हा. या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री दिला. सावली मतादरसंघातून निवडून गेलेले मारोतराव कन्नमवार राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह अनेक मात्तबर या भूमीतून घडले. राज्याला ऊर्जा देणारी, ब्लॅकगोल्ड सिटी, वाघांचा जिल्हा असे अनेक बिरूद जिल्ह्याला लाभले आहेत.

याच भूमीतून येणारे डॉ. अशोक जीवतोडे यांचेही विदर्भातील शिक्षण संस्थांमध्ये मोठे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते ओबीसींच्या हक्कासाठी लढा देत आहेत. क्षेत्र सामाजिक असो राजकीय की शैक्षणिक, त्यांनी नेहमीच आपली भूमिका चोखपणे बजावली आहे. आजपर्यत सक्रिय राजकारण करताना ते अनेकदा ‘किंगमेकर’ ठरले आहेत.

डॉ.जीवतोडे हे भाजपचे विदर्भातील प्रमुख ओबीसी नेते आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ओबीसींची लक्षणीय संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जीवतोडे हे ताकदीने ओबीसींची चळवळ पुढे नेत आहेत. विदर्भात त्यांच्या 50 पेक्षा अधिक संस्था आहेत. यात सहभागी प्रत्येकजण त्यांचे कुटुंब ठरले आहे. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकाला ते आपलेसे करत आहेत. त्यांनी मोठी सामाजिक ताकद निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी गेल्या अनेक वर्षांत केलेली कामे उल्लेखनीय आहेत.

डॉ.जीवतोडे यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. 1992 पासून ते चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. वडिलांप्रमाणेच विदर्भाच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. ॲड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य वेगळे व्हावे, यासाठी त्यांनी जनजागृती व व्याख्याने आयोजित केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी ओबीसी समाजाचे आंदोलन उभे केले. देवेंद्र फडणवीस, हंसराज अहीर, शरद यादव, बंडारू दत्तात्रेय, तेजस्वी यादव, इंद्रजित सिंग, हुकूम देव नारायण सिंह व देश पातळीवरील अनेक राजकीय तथा सामाजिक नेत्यांसोबत त्यांचा सहभाग राहिला आहे.

Dr.Ashok Jivtode
Chandrapur : कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांसाठी गोंडपिपरीच्या एसडीओने घेतला निर्णय की...

पूर्व विदर्भातील 27 तालुक्यांत जनजागृती सभा त्यांनी घेतल्या. 8 डिसेंबर 2016 रोजी नागपूर विधानभवनावर त्यांनी मोर्चा काढला. पदवीधर मतदार नोंदणीत नागपूर जिल्ह्याखालोखाल 20 हजारांपेक्षा जास्त पदवीधर नोंदणी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केली. त्यावेळी 2008 मध्ये नितीन गडकरी व 2014 मध्ये प्रा.अनिल सोले निवडून आले. शिक्षक मतदारसंघातही त्यांचे वजन आहे. या मतदारसंघातून नागो गाणार हे 2010 व 2016 मध्ये विजयी झाले.

त्यात डॉ.जीवतोडे यांची भूमिका महत्त्वाची होती. डॉ. जीवतोडे यांनी ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला ते सर्व विजयी झाले. बंधू दिवंगत संजय जीवतोडे यांना त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी केले. भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघात 2004 मधील निवडणुकीतही संजय यांना बऱ्यापैकी मते मिळाली होती. डॉ.जीवतोडे यांचे वडील श्रीहरी जीवतोडे हे स्वतः अपक्ष म्हणून 1967 मध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

नाव (Name)

डॉ.अशोक श्रीहरी जीवतोडे

जन्मतारीख (Birth Date)

11 जून 1961

शिक्षण (Education)

एम.कॉम., एम.ए.(अर्थशास्त्र), एम.फिल., एम.एड., पी.एचडी.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

पश्चिम महाराष्ट्रातील कर्मवीर भाऊराव पाटील, पश्चिम विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या खालोखाल शैक्षणिक क्षेत्रात पूर्व विदर्भात माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी घराघरांत शिक्षणाची गंगा पोहोचविली. त्या कुटुंबात डॉ.अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा जन्म झाला. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे हे जिल्हा परिषद सदस्य होते.

पत्नी डॉ.सौ.प्रतिभा अशोक जीवतोडे या एमए.एमएड.पी.एचडी आहेत. मुलगी यशस्वी नचिकेत गोहोकर या अभियंता (बीई., एमएस.) असून त्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतात. पुत्र अंबर हेही अभियंता (बीई., एमएस.) असून, ते सोलर व्यवसाय पाहतात. किशोर, अजय, राजेश हे त्यांचे बंधू आहेत. अन्य दोन बंधू दिलीप आणि संजय यांचे निधन झाले आहे. शकुंतला आवारी, यमुताई चौधरी, नालिनी सोनटक्के, शालिनी जांभुळकर, सीमा दर्वे, अर्चना काळे या त्यांच्या भगिनी आहेत.

Dr.Ashok Jivtode
Chandrashekhar Bawankule : लोकसभेसाठी महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, बावनकुळेंनी 'या' नावाची केली घोषणा

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

माजी प्राचार्य, जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन, चंद्रपूर

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

चंद्रपूर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. प्रत्येक निवडणूक जिंकविणारे ते किंगमेकर ठरलेले आहेत. उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते व्यूहरचना करतात.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

धनोजे-कुणबी शेतकरी समाज एकत्रीकरण त्यांनी केले. विदर्भ विकासाचा ध्यास घेऊन विविध कार्यक्रम त्यांनी घेतले. त्यासाठी आंदोलनेही केली. विदर्भ विकासाचे महत्व त्यांनी पटवून दिले. ओबीसी समाजाला एकत्र आणण्याची मोहीम राबविली. ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. ओबीसींच्या संवैधानिक मागण्यांसाठी लढा उभारला. आतापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून ओबीसींच्या 24 मागण्यांची पूर्तता करून घेत शासन निर्णय काढून घेतले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात डॉ.अशोक जीवतोडे हे नाव मोठे आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेकांना ते व्यक्तिशः ओळखतात. त्यांच्यासोबत असलेला थेट संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देताना ते कधीच भेदभाव करीत नाहीत. संवेदनशील व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर डॉ. अशोक जीवतोडे सक्रिय आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लोकांना जोडून घेतले आहे. समाजमाध्यमातून ते नेहमीच आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

वादग्रस्त विधानांपासून ते कायम दूर राहिले आहेत.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे गुरुजी

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

उच्च शिक्षण, दांडगा जनसंपर्क, निवडणुकीचा अनुभव, अजात शत्रू व सुपरिचित हसतमुख उमदे व्यक्तीमत्व, लोकांना सहज उपलब्ध होणारे तथा लोकांची कामे सहज करणारे व्यक्तिमत्व. सामान्य नागरिकांमध्ये सहजपणे मिसळणारे नेते अशी त्याची ओळख राहिली आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

डॉ. अशोक जीवतोडे हे केवळ आपल्याच समाजासाठी काम करतात, असा आरोप विरोधक त्यांच्यावर करतात.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते ? (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

चंद्रपूर, वणी, आर्णी हा लोकसभा मतदारसंघ ओबीसी व कुणबीबहुल असल्याने उमेदवार हा याच समाजाचा असावा, अन्यथा पक्षाला दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून आणणे कठीण कठीण जाऊ शकते.

(Edited By Ganesh Thombare)

Dr.Ashok Jivtode
Ashok Jivtode News : ...आणि म्हणून ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला केला रामराम !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com