Hit & Run : नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रकचालकांचे चक्का जाम आंदोलन

Road Block : आंदोलनाबाबत अनेक ठिकाणी संभ्रमावस्था कायम; इंधन, सिलिंडरचा पुरेसा साठा
Road Block at Yavatmal.
Road Block at Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केल्यानंतर ‘हिट अॅन्ड रन’ संदर्भातील शिक्षा आणि दंडाची तरतूद अद्याप लागू केलेली नाही. असे असतानाही बुधवारपासून (ता. 10) विदर्भात अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ट्रक चालकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे यवतळ-नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

बुधवारी सकाळीच या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ शहराच्या आसपासची वाहतूक देखील विस्कळीत झाली. ‘हिट अॅन्ड रन’च्या प्रकरणांमध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ट्रक चालकांनी आंदोलन केल्याने केंद्र सरकारने नवीन कायद्याची तरतूद लागू होणार नाही, असे जाहीर केले होते.

Road Block at Yavatmal.
Yavatmal : विधान परिषदेत वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकाऱ्यावर आमदाराचे जडले प्रेम...!

ट्रक चालक आणि सरकारमध्ये यासंदर्भात वाटाघाडी सुरू असतानाच बुधवारपासून ट्रक चालकांनी तीन दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत विदर्भातील काही जिल्ह्यांमधील संघटनांमध्ये संभ्रम दिसून आला. काही संघटनांनी कोणताही देशव्यापी संप नाही, असे स्पष्ट केले. तर काही संघटनांनी तीन दिवसांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ट्रक चालक, मालकांमध्येही एकवाक्यता आढळली नाही.

तीन दिवसांच्या या संपामध्ये इंधन आणि गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या चालकांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे विदर्भात पुन्हा इंधन तुटवडा भासणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली. परिणामी बुधवारी सकाळपासूनच विदर्भातील अनेक पेट्रोल पम्पांवर पुन्हा गर्दी दिसू लागली. विदर्भातील साडेतीन दिवस पुरेल इतका इंधनसाठा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय गॅस सिलिंडरचीही पुरेशी संख्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच बुधवारी सकाळी ट्रक चालकांनी यवतमाळ-नागपूर-तुळजापूर मार्गावर आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आंदोलनामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही ट्रक चालकांच्या संपावर परिणाम दिसत आहे. मात्र सकाळच्या सुमारास या आंदोलनाची तीव्रता कमी जाणवली. दुपारी बारा वाजेपर्यंत विदर्भात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नव्हती.

ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम सामान्यांवर जाणवू नये, यासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणा तयारीत आहे. संपाची शक्यता पाहता प्रशासनाने यापूर्वीच पेट्रोलियम डिलर्सशी चर्चा करीत सर्वच जिल्ह्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना वितरकांना दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी (ता. 9) रात्रीपर्यंत जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Road Block at Yavatmal.
Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com