RSS Headquarters : संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा जामीन फेटाळला

Bombay High Court Nagpur Bench rejected bail Rais Shaikh RSS Headquarters premises : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची रेकी केल्याचा आरोप कथित दहशतवादी रईस शेख याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे.
RSS Nagpur
RSS NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Update : औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या दंग्यामुळे नागपूरमध्ये वातावरण तापले असतानाच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप असलेल्या कथित दहशतवाद्याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला.

त्याच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्याना जामीन देणे योग्य ठरणार नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. रईस शेख, असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सप्टेंबर 2021 मध्ये काश्‍मीर येथून ताब्यात घेतले होते.

या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. कश्‍मीर पोलिसांनी एका प्रकरणात रईसला अटक केली असता त्याने 15 जुलै 2021 मध्ये नागपुरात (Nagpur) रेकी केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली.

RSS Nagpur
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांचे 'नेक्स्ट टार्गेट' ठरलं; आता अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई!

या ठिकाणांचा व्हिडिओ घेऊन त्याने तो हस्तकाला पाठवला. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी (Police) रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढे त्याला कश्मीरात जाऊन ताब्यात घेतले होते. पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकाच्या सांगण्यावरून रईस शेख जुलै 2021मध्ये नागपुरात आला होता.

RSS Nagpur
BJP Minister Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरण, मंत्री गोरेंच्या खंडणीच्या गुन्ह्यात मोठी अपडेट; उपमुख्यमंत्री शिंदेंचा 'सुभेदार' अटकेत

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आणि हेडगेवार स्मृती मंदिराची त्याने पाहणी केली आणि तो कश्मीरला परतला, असा आरोप त्याच्यावर आहे. न्यायालयाने ठोस पुरावे लक्षात घेत रईसचा जामीन अर्ज फेटाळला. रईस शेखतर्फे ॲड. निहालसींग राठोड यांनी तर राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली.

रईस जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात

रईसने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांशी असलेले संबंध दर्शविणारी कागदपत्रे आमच्या समोर आहेत. रईस पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या सदस्यांशी सतत संपर्कात होता, हे यातून प्रथमदर्शनी दिसून येते. रईसकडे जम्मू-कश्मीरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांकडून मिळवले जिवंत हँडग्रेनेड आढळले. ही बाब लक्षात घेत रईसला जामीन देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com