

Amravati News : माजी किक्रेटपटू आणि राज्यसभा सभागृहाचे खासदार राहिलेले सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulakr) प्रहार संघटनचे नेते व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी खुले पत्र लिहले आहे. जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहीराती करू नये, असं आवाहन पत्रातून बच्चू कडू यांनी तेंडुलकरांना केलं आहे. (Latest Marathi News)
बच्चू कडू म्हणाले, “माजी क्रिकेटपटू असलेले सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. भारतरत्न असणाऱ्या व्यक्तिने जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहीराती करणे, योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे की, त्यांनी अशा जाहीरातींवर तात्काळ बंदी घातली पाहिजे”
बच्चू कडूंनी पत्रात काय म्हंटलंय?
“पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. तेंडुलकर हे प्रसिद्ध माजी क्रिकेटर आहेत . भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान, थोर अशा सर्व स्तरांपर्यंत होतो. अशा जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत आहे. अनेकांचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आझाद मैदानात आंदोलनही केलेलं आहे.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.