Buldhana News : संभाजी भिडे यांच्यासोबत मी दोन तास होतो. एकाच मोटारीतून आम्ही प्रवास केला, हे खरं आहे. विदर्भातील शेती, युवक, सिंचन, शिक्षण याबाबत आमची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ‘मला पासलेगावकर मठ बघायचा आहे,’ अशी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनसार मी त्यांना पासलेगावकर मठापर्यंत घेऊन गेलो, असे भारतीय जनता पक्षाचे खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले. (Sambhaji Bhide expressed 'this' wish to the BJP MLA)
शिवप्रतिष्ठाचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे आज बुलडाण्यातील खामगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) हे त्यांच्यासोबत होते. त्याबाबत त्यांनी भिडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्या गावात चार संघटना संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. संघर्ष व्हायला नको, याची काळजी घेणे हे माझे काम आहे. मी या गावाचा आमदार आहे. संवदेनशील शहरात काही अनुचित घटना घडू नयेत, अशी माझी भूमिका आहे. कारण घटना घडल्यानंतर सर्व गावाला भोगावे लागते, म्हणून या गावातील लोकांना कर्फ्यूसारखा बंदोबस्त भागावे लागू नये, यासाठी मी प्रयत्न करत आहे.
महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे संभाजी भिडे यांचा निषेध शंभर टक्के केला पाहिजे. आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या विधानाचे समर्थन कोणीच करणार नाही, असेही आमदार फुंडकर म्हणाले.
काँग्रेस पक्षाने सभा उधळण्यापेक्षा त्यांनी अशा गोष्टी घडू नयेत, यासाठी चर्चा करावी. सभा उधळून काय भेटणार आहे. जेव्हा सावकरांचा अपमान राहुल गांधी करत होते. तेव्हा यांनी निषेध करायला हवा होता. औरंगजेबाच्या कबरीवर झुकायला जातात, तेव्हा त्यांनी निषेध करायला पाहिजे होता. आबू आझमी विधानसभेत वंद मातरम, भारत माता की जय असे म्हणतात, तेव्हा हे टाळा वाजवतात, त्याचे समर्थन करतात. तेव्हाही त्यांनी निषेध करायला पाहिजे, अशी अपेक्षाही आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली.
फुंडकर म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय होत आहेत. चांगली कामे होत आहेत. समाजातील सर्व घटकांसाठी काही ना काही काम चालू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलायला काही जागा उरलेली नाही; म्हणून मुद्दा फरकविटण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.