Sameer Wankhede : समीर वानखेडे राजकारणात सक्रिय होणार?; पश्चिम विदर्भात अचानक वाढले दौरे

Sameer Wankhede On Upsc Students : आर्यन खान प्रकरणात वादात अडकलेले अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
Published on
Updated on

Akola News : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या मुलावर कारवाई केल्यानंतर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक व सध्या केंद्रीय करदाते सेवा संचालनालय चेन्नई येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत समीर वानखेडे यांचे सध्या पश्चिम विदर्भातील दौरे वाढले आहेत. शनिवार २१ ऑक्टोबरला समीर वानखडे अकोल्यात होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सेमिनार हॉलमध्ये त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.

Sameer Wankhede
Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 'या' मेळाव्याकडे लक्ष!

अकोला दौऱ्यादरम्यान त्यांनी अशोक वाटिका येथे भेट दिली. तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना घेतली. 'राजकारण नव्हे, तर अकोला माझे घर मी येत राहणार. अकोला माझे घर असून कौलखेड परिसरात माझे बालपण गेले आहे. आता अठरा वर्षे सर्व्हिस झाली असून समाजाचं काही देणं आहे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यासाठीच आपण अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचे दौरे करीत आहे', असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात विदर्भात खासकरून वाशिम, अकोला जिल्ह्यात यूपीएससीसाठी विद्यार्थी घडविण्यावर भर राहणार असून त्यासाठी विविध सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक पुस्तकांचा पुरवठा करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्टुडंट फोरमतर्फे शनिवार, दिनांक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित यूपीएससी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाहीलाही त्यांनी संबोधित केले. याप्रसंगी स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉ. शिरीष तराळे, विकास पवार, रोहित पाटील, आचल राजपूत आदी उपस्थित होते.

राजकारणात सक्रिय होणार का, असे समीर वानखडे यांना विचारण्यात आले. 'पश्चिम विदर्भातील दौरे राजकीय उद्देशातून नाही. या भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाईची मोट बांधायची आहे. स्पर्धा परीक्षांचा विशेष करून यूपीएससीचा अभ्यास करताना त्यांना मदत मिळावी, यासाठीच हे दौरे असल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील क्रूजवरील ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला गोवण्याचा आरोप समीर खान यांच्यावर झाला होता. हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. त्यानंतर समीर वानखडे यांची मुंबई एनसीबीतून बदली करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण गाजत असताना समीर वानखडे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झालेत. त्यानंतर वानखडे हे राज्याची उपराजधानी नागपूर येथे संघभूमी व दीक्षाभूमी दोन्ही ठिकाणी गेले होते.

सध्या चेन्नईला असलेले समीर वानखडे यूपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे सरसावले आहे. विदर्भाच्या मातीशी नातं जुळलेलं असल्याने समीर वानखडे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करीत आहेत. त्यातून तरुणाईमध्ये त्यांचा जनसंपर्क सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

Sameer Wankhede
Chandrapur Morcha News : बहुजनांची पोरं शिकू लागली, सरकार शाळा विकू लागली...; मुनगंटीवारांचं घर येताच तुफान घोषणाबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com