Sana Khan Murder Case : चौकशी तर झाली, पण ‘त्या’ आमदाराची शहरभर चर्चा !

Nagpur Police : सीताबर्डी परिसरात परिमंडळ दोन पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे जेव्हा ते निघाले.
MLA Sanjay Sharma
MLA Sanjay SharmaSarkarnama

Nagpur Crime News : सना खान यांच्या खून प्रकरणात जबलपूरचे कॉंग्रेसचे आमदार संजय शर्मा काल (ता.२४) चौकशीसाठी ताफ्यासह नागपुरात दाखल झाले. त्यामुळे परिसरात नेमके शहरात कोण दाखल झाले? याचीच चर्चा होती. (Who exactly entered the city in the area? This was the discussion)

कॉंग्रेसचे आमदार असलेले संजय शर्मा हे जबलपूरचे बाहुबली आमदार आहेत. अनेक व्यापारांत ते असल्याचीही चर्चा अनेकदा समोर येते. त्यामुळे या परिसरात त्यांचा चांगला दबदबा आहे. सना खान यांच्या खुनातील मुख्य आरोपी पप्पू शाहू हा काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे काम करीत असल्याची माहिती समोर आली.

शिवाय अटक होण्याच्या एका दिवसापूर्वी त्याने आमदाराची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी नागपूर पोलिसांनी बोलावले होते. काल (ता. २४) सकाळीच त्यांनी नागपूर गाठले. एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबून लवाजम्यासह ते चौकशीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यात दहा ते बारा चारचाकी वाहन असल्याचेही दिसून आली.

विशेष म्हणजे, ते चौकशीसाठी येणार हे कळताच, नागपुरातील काही भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्तेही चौकशी स्थळ परिसरात हजर झाले. दरम्यान चौकशी संपल्यावर ते रामटेक येथील रिसॉर्टवर जेवण करून परतीच्या प्रवासाकडे निघाले. मात्र, यादरम्यान त्यांच्या ताफ्याची चर्चा संपूर्ण परिसरात रंगलेली होती.

MLA Sanjay Sharma
Nagpur Congress News : ‘भारत जोडो’त जे झाले नाही, ते आता नागपुरात घडले; दिग्गज कॉंग्रेस नेत्यांचे हातात हात !

भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या खूनप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सना खान यांचा खून केल्यावर आरोपी अमित ऊर्फ पप्पू शाहू याने दहा तारखेला जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यातूनच नागपूर पोलिसांनी आमदार शर्मा यांना चौकशीसाठी नागपुरात बोलाविले.

जबलपूरचे आमदार संजय शर्मा हजर झाल्यावर त्यांची परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या कार्यालयात दोन तास चौकशी करण्यात आली. या दोन तासात आमदारांना २२ प्रश्‍न विचारण्यात आले. सना खान यांचा तीन ऑगस्टला अमित ऊर्फ पप्पू शाहू याने खून केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. अकरा तारखेला त्याच्यासह राजेश सिंग याला पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली.

MLA Sanjay Sharma
Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !

त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी धर्मेंद्र सिंग, रविशंकर यांच्यासह कमलेश पटेल यालाही अटक केली. यावेळी अमित याच्या मोबाईलवरून पोलिसांना तो जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांना भेटल्याची माहिती मिळाली. याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने पोलिसांच्या हाती लागण्याच्या एक दिवस आधी १० तारखेला आमदार संजय शर्मा यांची भेट घेतल्याची बाब समोर आली.

पोलिसांनी त्यांना २३ ऑगस्टला आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार गुरुवारी (ता.२४) सकाळी आमदार शर्मा परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आले. यानंतर सना खानच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला पप्पू शाहू आणि त्याच्या साथीदारासमक्ष चौकशी करण्यात आली. यावेळी सना खान यांची आई मेहरुनिसा खान याही उपस्थित होत्या. तब्बल दोन तास चाललेल्या चौकशीमध्ये आमदारांना २२ प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांनी सर्व प्रश्‍नांची उत्तरेही दिल्याची माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.

MLA Sanjay Sharma
Nagpur News : रिंगरोडग्रस्त शेतकरी बनला फुटबॉल, तब्बल २५ वर्षानंतरही नाही मिळाला सुधारित सात-बारा !

सना खान प्रकरणात आमदार (MLA) संजय शर्मा चौकशीसाठी सकाळी अकरा वाजता हजर झाले. त्यांना प्रकरणासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यांनी चौकशीदरम्यान संपूर्ण सहकार्य केल्याचे नागपूर (Nagpur) शहर पोलिस परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले.

सना खान हत्याकांडातील आरोपी अमित शाहू हा १५ वर्षांपूर्वी आमचा कर्मचारी होता. हत्याकांडानंतर त्याच्याशी काहीही संबंध नाही. आज पोलिसांनी (Police) अमित शाहूला आमोरा सामोर बसून विचारपूस केली. त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पोलिसांना चौकशीदरम्यान संपूर्ण सहकार्य केल्याचे आमदार संजय शर्मा यांनी सांगितले.

MLA Sanjay Sharma
Nagpur District News : चार मिनिटांत संपविल्या मुलाखती, अन् बाहेरगावच्यांना पोलिस पाटील म्हणून निवडले !

सना खानच्या खुनानंतर तिच्या चित्रफितीच्या माध्यमातून अनेकांना कोट्यवधींची मागणी करण्यात आल्याचे काही प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत आहे. तिच्याकडे १० सिमकार्ड असल्याचीही बतावणी करण्यात आली आहे.

आमच्यावर ३१ लाखाचे कर्ज असून त्याचे हप्ते भरताना आम्हाला बराच त्रास होतो. कोट्यवधी रुपये असते तर कर्ज घेण्याची गरज पडली असती काय? अद्याप सनाचा मृतदेह मिळालेला नाही. पण पोलिसांनी यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचे सनाची आई मेहरूनिसा खान यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com