Sand smugglers attacked:वाळू तस्करांनी केला सरपंचासह तंटामुक्ती अध्यक्षावर चाकू हल्ला

Tantamukti President along with Sarpanch: वाळू तस्करांना केला अडविण्याचा प्रयत्न
Sand smugglers, Nagpur.
Sand smugglers, Nagpur.Sarkarnama

Chandrapur News : बेकायदा सुरू असलेली वाळू चोरी थांबविण्यासाठी गेलेल्या सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि उपस्थित महिलांवर वाळू तस्करांनी चाकू तसेच लोखंडी रॅाडने हल्ला केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कुलथा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या हल्ल्यात सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत.

चंद्रपूर जिल्हयात वाळू उत्खनाचे लिलाव बंद आहेत. मात्र अनेक ठिकाणी वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू तस्करी सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वाळूला मोठी मागणी आहे. कुलथा घाट हा बेकायदा वाळू तस्करांचा अड्डा बनला आहे. चंद्रपूरातील वाळू तस्करांकडून या घाटावरून मोठया प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असतांना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. गावकऱ्यांना दमदाटी करणे, धमकविणे असे प्रकार याठिकाणी सर्रासपणे सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sand smugglers, Nagpur.
Congress Vs BJP : काँग्रेसला स्थापना दिवशीच भाजपने पाडले खिंडार!

बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील तारडा गावचे सरपंच तरूण उमरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर लखमापूरे व काही महिला पदाधिकारी कुलथा वाळू घाटावर पोहचले. त्यांनी वाळू उपसा करणाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिडलेल्या वाळू तस्करांनी चाकूने व लोखंडी रॅाडने सरपंच उमरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लखमापूरे व महिलांवर हल्ला केला. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यांनतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरीचे पोलिस अधिकारी जीवन राजगुरू हे घटनास्थळावर दाखल झाले. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. वाळू तस्करांकडून जीवघेणे हल्ले केले जात असताना प्रशासनाकडून त्यांना अभय दिले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सरपंच उमरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या हल्ल्याची माहिती समजताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रंचड संताप व्यक्त करत दोषींना तातडीने अटक करून कार्यवाहीची मागणी केली आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Sand smugglers, Nagpur.
Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पणन महासंघाला अखेर कापूस खरेदीस मान्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com