Sangita Shinde BJP Anil Bonde meeting : भाऊ प्रचारात विरोधात, वहिनी मैदानात सोबत; भाऊबीजेला संगीता शिंदेंनी गाठलं भाजप खासदार अनिल बोंडेंचं घर!

Sangita Shinde meets BJP MP Anil Bonde on Bhaubeej after losing the Amravati Teachers Constituency election. Know what the meeting signals about family ties and her political future : अमरावती शिक्षक मतदारसंघातील पराभवानंतर डॉ. संगीता शिंदेंची खासदार अनिल बोंडे यांच्याशी भेट; राजकीय मतभेदांवर पडदा पडल्याचे संकेत, नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार.
Sangita Shinde meets BJP MP Anil Bonde
Sangita Shinde meets BJP MP Anil BondeSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP rebellion in Amravati : अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महायुतीतील जागावाटपावरून झालेल्या राजकीय संघर्षामुळे चांगलीच गाजली. विशेषतः भाजपमधील बंडखोरीने या निवडणुकीची रंगत वाढवली होती.

भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची बहीण डॉ. संगीता शिंदे यांच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांच्यासोबत भाजपचे नेते चंद्रशेखर भोयर यांनीही बंडखोरीचे निशाण फडकावले होते. या दोघांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, या बंडखोरीमुळे बोंडे कुटुंबातही राजकीय मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी महायुतीचा धर्म पाळत एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी डॉ. वसुधा बोंडे या भावजय डॉ. संगीता शिंदे यांच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीच्या काळात बोंडे कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, दिवाळीतील भाऊबीजेच्या निमित्ताने या राजकीय दुराव्यावर पडदा पडल्याचे संकेत मिळाले आहेत.

अमरावती (Amravati) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. संगीता शिंदे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने खासदार भाऊ डॉ. अनिल बोंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता समाजातील गरजू लोकांसाठी काम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Sangita Shinde meets BJP MP Anil Bonde
Amol Khatal And Shubhangi Patil : अमोल खताळांचा दिवाळीनंतरचा डाव सुरू? थोरात-तांबेंच्या विरोधकाला सोबत घेत भाऊबीज साजरी!

'निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचे नाही. लोकांच्या सेवेचे काम अविरत सुरू ठेवायचे. प्रत्येक अपयशामागे यशाची एक किनार असते,' अशा शब्दांत खासदार डॉ. अनिल बोंडे आणि डॉ. वसुधा बोंडे यांनी संगीता शिंदे यांना धीर दिला. भाऊ आणि वहिनीकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आपल्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगत, 'मी पराभवाने खचून जाणार नाही. ज्यांना माझी खरोखर गरज आहे, त्या प्रत्येकासाठी नव्या उमेदीने काम करत राहणार आहे,' अशी भूमिका डॉ. संगीता शिंदे यांनी मांडली.

Sangita Shinde meets BJP MP Anil Bonde
Anna Hazare reacts Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात अण्णा हजारे चर्चेत; 'रंगीत चष्म्या'चा दाखला देत अण्णांचा पलटवार!

अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. मात्र, या जागेवर भाजपनेही दावा केला होता. दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीला उमेदवार जाहीर केला आणि नंतर उमेदवारी मागे घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. या भूमिकेवरून अमरावती भाजपने नाराजी व्यक्त केली होती. पुण्यात शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळावा, अशी भूमिका घेत अमरावतीत भाजप वेगळी भूमिका घेऊ शकते, असे संकेत स्थानिक नेत्यांनी दिले होते.

याच पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली आणि बंडखोरी उफाळून आली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची बहीण डॉ. संगीता शिंदे यांच्यासह चंद्रशेखर भोयर, सुमित पवार, नितीन गुडधे, दिलीप कडू आणि महंत सुनील महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी महंत सुनील महाराज यांनी माघार घेतली. मात्र, संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला.

चंद्रशेखर भोयर यांनी प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली होती. भाजपने पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत डॉ. संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती.

किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी

या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी 16 हजार 663 मते मिळवत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसच्या अदिती पोहरे 8 हजार 636 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 7 हजार 117 मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

संगीता शिंदेंचा पुन्हा निर्धार

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही डॉ. संगीता शिंदे यांनी राजकीय आणि सामाजिक काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने बोंडे कुटुंबातील राजकीय मतभेद दूर झाल्याचे संकेत मिळत असताना, भाजपमधील त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.