संजय राऊत-अमितेश कुमार भेट सहज नाही, भाजपला धास्ती..

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) येऊन पोलिस आयुक्त (Police Commissioner) अमितेश कुमार यांची भेट घेतली. यामुळे अनेकजण धास्तीत आहेत.
Sanjay Raut-Amitesh Kumar Meeting
Sanjay Raut-Amitesh Kumar Meeting Sarkarnama
Published on: 
Updated on: 

नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आरोप केलेले अमोल काळे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्याचे सांगितले जाते. परवा संजय राऊत अचानक नागपुरात आले आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असे राऊत सांगत असले तरी, ही भेट तेवढी सहज नव्हती, असे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जात आहे. संजय राऊत - सीपी भेटीमुळे भाजपच्या गोटात धास्ती असल्याचेही बोलले जात आहे.

फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कार्यकाळात अमोल काळे यांना नागपूर (Nagpur) महापालिकेचे एलईडी पथदिवे लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. ते सध्या मुंबई (Mumbai) क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. एकूणच संजय राऊत यांचे तडकाफडकी नागपुरात येणे आणि पोलिस आयुक्तांची (Police Commissioner) भेट घेणे ही नियमित आणि साधीसुधी बाब नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. केंद्रापासून ते राज्यातील भाजपच्या नेत्यांना शिंगावर घेणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूरमध्ये येऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यामुळे अनेकजण धास्तीत असून ते कोणता बॉम्ब फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत रविवारी नागपुरात आले होते. शहरात आल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले. फक्त सदिच्छा भेट होती, असे सांगितले. मात्र, अलीकडेच राऊत यांनी महाआयटी घोटाळ्यात अमोल काळे आणि अजय ढवांगळे यांची नावे घेतली होती. अमोल काळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. ते लंडनला पळून गेले असावे, अशी शंकाही व्यक्त केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी काळे यांनी राऊत यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले.

Sanjay Raut-Amitesh Kumar Meeting
Video: आता माझ्या नागपूर फेऱ्या वाढतील... ;संजय राऊत

संजय राऊत यांचे नातेवाईक तसेच कुटुंबीयांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. तेव्हापासून ते जास्तच आक्रमक झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढू, असाही इशारा राऊत यांनी दिला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि कारवाया आता वैयक्तिक स्तरावर आले असल्याने राऊत यांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन फडणवीस यांच्या निकटवर्तीयांची माहिती गोळा करीत असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Morshi Municipal Council Mutton Party
Akot Gambling Raid | 22 Gamblers Arrested | Police Action
BJP Leader : भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले नेते मुख्यमंत्र्यांसोबत; फोटो व्हायरल, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केली होती बंडखोरी
chandrashekhar bawankule, balvant wankhede