संजय राऊतांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवले, म्हणून...

हाच राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. यालाच ते गुन्हा मानत आहेत, म्हणून ईडीचा ससेमिरा राऊत यांच्या मागे लावण्यात आला असल्याचा घणाघाती आरो युवा सेनेचे वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला.
Varun Sardesai
Varun SardesaiSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : खासदार संजय राऊत यांचा नेमका गुन्हा काय, हे भाजपचे नेतेसुद्धा शकत नाहीये. २०१९ची विधानसभा निवडणूक झाल्यावर दीड महिना ते दररोज टीव्हीवरती आले आण त्यांच्या प्रयत्नांतून भाजपचे १०५ आमदार त्यांनी घरी बसवले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला, हाच राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. यालाच ते गुन्हा मानत आहेत, म्हणून ईडीचा ससेमिरा राऊत यांच्या मागे लावण्यात आला असल्याचा घणाघाती आरो युवा सेनेचे वरूण सरदेसाई (Varn Sardesai) यांनी केला.

आज नागपुरात आल्यावर विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, माजी जिल्हाप्रमुख सतीष हरडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल काकडे आणि इतर पदाधिकारी होते. ते म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे शिवसेनेची (Shivsena) बुलंद तोफ आहेत. ते केवळ सेनेचे नेतेच नाहीत, तर प्रमुख वक्ते आहेत. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यात त्यांची काय भूमिका होती, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घ्यायचे ठरवले तरी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरतो, हेसुद्धा राज्याने पाहिले आहे. ईडीने त्यांच्यावर जी कारवाई केली, ती आकसातून केलेली आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट झाले आहे.

निश्‍चय दौऱ्यासाठी विदर्भात..

युवा सेनेचा निश्‍चय दौरा महाराष्ट्रभर सुरू आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्र असा २ हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा पट्टा आमच्या टिमने पिंजून काढला. याच कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही नागपुरात आलो आहोत. आज नागपूर आणि शेजारच्या ४ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर अमरावतीला जाऊन तेथे पश्‍चिम विदर्भातील ५ जिल्ह्यांचा मेळावा घेणार आहोत. त्यानंतर उद्या गडचिरोली आणि आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही युवा सेनेचा पदाधिकारी संवाद दौरा आम्ही केला होता आणि विदर्भात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे वरूण सरदेसाई म्हणाले.

Varun Sardesai
#COVID2019  एवढाच अनुभव असेल तर फडणवीसांना वुहानला पाठवा : वरूण सरदेसाई

चांगल्या कामामुळे हर्षल काकडेंना बढती..

युवा सेनेचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हर्षल काकडे यांच्या नेतृत्वात काम चांगले चाललेले आहे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र कार्यकारिणीत विभागीय सचिव म्हणून जबाबदारी दिलेली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक कार्यकारिणी सदस्यांनी आता युवा सेनेत प्रवेश केलेला आहे. युवा सेनेचे ताकद कशी वाढवता येईल, जास्तीत जास्त युवा शिवसेनेसोबत कसा जोडता येईल, याकरिता युवा सेना प्रयत्नशील आहे. आजच्या मेळाव्यानंतर आमची ताकद निश्‍चित वाढेल आणी येत्या महानगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल, असे वरून सरदेसाई म्हणाले.

शिवसेना किंगच्या भूमिकेत..

शिवसेना कुणाचीतरी बी टीम आहे, असा आरोप केला जातो, याबाबत विचारले असता सरदेसाई म्हणाले, असे अजिबात नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेना आता किंगमेकरच्या नव्हे तर किंगच्या भूमिकेत आहे. ही बाब विरोधकांना पचत नाहिये, त्यामुळे खोटेनाटे आरोप केले जात असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com