तुषार पाटील
Nagur News पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : भाजपचे सर्वात तरुण आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते संतोष दानवे आपल्या सहकाऱ्यांसह `क्रिकेटनामा`चे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. विदर्भाच्या राजधानीत होणाऱ्या पहिल्याच `क्रिकेटनामा` स्पर्धेत दानवे भाजपच्या संघाला किंग ठरवत देवेंद्र फडणवीसांना गिफ्ट देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
`बीजेपी किंग` सोमवारी (ता. ११) रोजी विदर्भातील बडे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय विरोधक असलेल्या नाना पटोले यांच्या `काँग्रेस वारियर्स`शी भिडणार आहेत. या प्रतिष्ठेच्या सामन्याचे नेतृत्व मराठवाड्यातील तरूण, तडफदार आमदार संतोष दानवे हे करत आहेत. क्रिकेटनामाचा फिवर नागपूरात चांगलाच वाढला आहे.
सर्वच राजकीय पक्षांचे संघ क्रिकेटनामाचा पहिला किताब आपल्या नावावर करण्यासाठी पुढील दोन दिवस पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीतील मैदानावर झुंजणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी `बीजेपी किंग`ची धुरा संघातील सर्वात युवा नेतृत्वावर सोपवली आहे. आमदार संतोष दानवे यांनी काँग्रेस वाॅरिअर्सला धूळ चारण्यासाठी रणनीती आखली असून त्यांच्या नेतृत्व कौशल्याकडे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह बड्या नेत्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे.
दानवे यांच्यासाठी `क्रिकेटनामा` ही एक परीक्षाच ठरणार असून यामध्ये ते विशेष प्राविण्यासह भाजपला किंग ठरवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दानवे हे आपल्या यंग ब्रिगेडसह क्रिकेटनामाचा चषक पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. क्रिकेटनामा चे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारी (ता.11) दुपारी ४ वाजता पहिला सामना दानवेंच्या नेतृत्वाखाली `बीजेपी किंग` विरुद्ध नाना पटोले यांच्या `काँग्रेस वाॅरिअर्स` विरोधात होत आहे. या सामन्यात पहिला विजय मिळवत संतोष दानवे फडणवीस, मुनगंटीवार यांच्यासह आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहचवतात का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
Edited by Roshan More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.