Sarkarnama Impact : कोंबड्यांची झुंज भोवली, तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली !

SDPO : उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे.
Bhandara Police
Bhandara PoliceSarkarnama
Published on
Updated on

Hasty transfer of three police to headquarters : राज्यात बंदी असलेल्या कोंबड्याच्या झुंजीला प्रोत्साहन देणे आणि झुंज लावणे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी कोंबड्यांची झुंज लावत असतानाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, कारवाई करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याच्या मोह झाला. पण हा मोह त्यांना चांगलाच महागात पडला आहे. झुंज बघण्याच्या व्हिडिओ काल वायरल झाल्यावर ‘सरकारनामा’ने ‘स्वतः पोलिसच भरवतात कोंबड बाजार, अन् तेसुद्धा चक्क फडणवीसांच्या जिल्ह्यात!’ हे वृत्त दिले होते.

सरकारनामाच्या वृत्ताची दखल भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी घेतली. बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये लाखांदूर बीट जमादार वकेकर, बीट जमादार भोयर व एएसआय नैताम यांच्या समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू झाली आहे. साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मतानी यांनी सांगितले. त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एक पोलिस (Police) कर्मचारी स्वतः कोंबड्यांची झुंज लावताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर इतर ३ पोलिस कर्मचारी ही कोंबड्यांची झुंज पाहण्यात दंग झालेले दिसतात. काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भंडारा (Bhandara) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी या पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने बदलीची कारवाई केली आहे.

Bhandara Police
Bhandara : भंडाऱ्यातही रुजणार बीआरएसची पाळेमुळे, लवकरच जिल्हा शाखेची स्थापना !

कोंबड्यांच्या झुंजी लावणे आणि त्यावर जुगार खेळणे, या प्रकाराला महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे. कुठे असा प्रकार आढळला तर पोलिस कारवाई करतात. पण येथे तर पोलिसच कोंबड बाजार भरवताना आणि स्वतः कोंबड्यांची झुंज लावताना जिल्हावासीयांनी पाहिले. त्यामुळे या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते गृहमंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे या प्रकाराची तात्काळ दखल घेतली गेली, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com