Scam Of Eight Crore : मोदी, शहांचे नाव घेत आठ कोटींनी गंडा घालणारे तिघे मोकाटच !

Yavatmal : बेताची आर्थिक स्थिती असलेल्या अनेकांनी प्रलोभनाला बळी पडून कर्ज काढून मीरा फडणीसला पैसा दिला.
Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Scam Of Eight Crore : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी ओळख असून केंद्रीय पर्यटन विभाग आणि रेल्वेत विविध निविदांतर्गत गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारी यवतमाळ येथील महिला मीरा फडणीसवर कारवाई कधी करणार, असा सवाल आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशातील बनारस, लखनऊपासून ते महाराष्ट्रातील यवतमाळ आणि मुंबईपर्यंत नेटवर्क असलेल्या टोळीने विदर्भातील सुमारे ७० जणांना जवळपास ८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांपैकी महेश ठाकरे, सचिन धकाते, निर्मला मंत्री, सुनील कुहीकर, माणिक पांडे, प्रसाद आगरकाठे आणि सुभाष मंगतानी यांनी सांगितले की, यवतमाळची मूळ रहिवासी असलेल्या मीरा फडणीस नामक महिलेने पर्यटन विभागात गाड्या भाड्याने देणे आणि रेल्वेत लिनन क्लिनींगच्या कंत्राटाद्वारे मोठ्या कमाईचे आमिष दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली.

Narendra Modi and Amit Shah
Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजपकडून अनेकांची नावे चर्चेत, पण कुणाला मिळणार उमेदवारी?

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागाचे अधिकृत कंत्राट आणि त्या माध्यमातून उत्पन्न मिळेल या आशेने गुंतवणूकदारांनी कर्ज काढून कोट्यवधी रुपयांची (बँक ट्रांझॅक्शनच्या माध्यमातून) गुंतवणूक केली होती. याप्रकरणी मीरा फडणीस हिचा साथीदार असलेला अनिरुद्ध होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.

होशिंग हा स्वयंघोषित पर्यटन विभागाचा अधिकारी बनून फसवत होता. होशिंग सध्या नागपूर कारागृहात आहे. परंतु, या प्रकरणातील आमिर शेख, राहुल शर्मा आणि मीरा फडणीस अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे मीरा फडणीस आणि तिच्या टोळीतील लोकांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल पीडितांनी केला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना पीडितांनी सांगितले की, बेताची आर्थिक स्थिती असलेल्या अनेकांनी प्रलोभनाला बळी पडून कर्ज काढून मीरा फडणीसला पैसा दिला. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार तिने बँक ट्रांझॅक्शनच्या माध्यमातून केला. तसेच भारत सरकारची राजमुद्रा वापरून बोगस कागदपत्रे आणि पंतप्रधान नरेंद्र, मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत अशी दिग्गजांची नावे वापरून बैठक घेतली जाणार असल्याचे भासवले.

नागपुरातील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे कार्यक्रम पत्रिका वाटप केले. परंतु, आजतागायत कुठल्याही गुंतवणूकदाराला एक रुपयादेखील परत मिळालेला नाही. त्यासोबतच मीरा फडणीसने गुंतवणूकदारांकडून विविध बँक खात्यांच्या माध्यमातून पैसे स्वीकारले. यात मीरा फडणीसची मुलगी शर्वरी हिच्या बँक खात्यात देखील २१ लाख रुपये जमा करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल..

पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी ओळख असल्याचे सांगून या टोळीने विदर्भात अनेकांना गंडा घातला. यवतमाळ, नागपूरसह अनेक ठिकाणी या घोटाळ्याची व्याप्ती आहे. यवतमाळ येथेही या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com