Krupal Tumane : ''शालार्थ आयडी घोटाळ्यात मंत्रालयातील मोठे मासे'' ; कृपाल तुमानेंचा दावा!

MLA Krupal Tumane’s Statement on Shalarth Scam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्र लिहून याची झाडाझडती घेण्याची मागणी केली आहे.
Krupal Tumane
Krupal TumaneSarkarnama
Published on
Updated on

Krupal Tumane alleges involvement of top officials in Shalarth ID scam : नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वांचीच चौकशी सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपसुद्धा सुरू आहे. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनीही या वादात आता उडी घेतली आहे. त्यांनी थेट मंत्रालयात बसणाऱ्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांवरच घोटाळ्याची शंका व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्र लिहून याची झाडाझडती घेण्याची मागणी केली आहे.

भाजपचे आमदार संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्या दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण घोटाळ्याची तक्रार आणि चौकशी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने काही तरी षडयंत्र रचण्यात आले असल्याचे सांगून भाजपच्या आमदारांवर शंका व्यक्त केली होती. आपल्याकडे पुरावे येत आहे. ते आल्यावर यात गुंतलेल्या आमदाराचे नाव आपण जाहीर करणार असल्याचा इशारा दिला होता.

मात्र यास महिनाभर झाला असला तरी वडेट्टीवारांनी अद्याप कोणाचे नाव जाहीर केले नाही. राज्याचे माजी गृहमंत्री तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पोलिस आयुक्तांना काही पुरावे सादर केले होते. काटोल विधानसभा मतदारसंघातील दलालांची यादीही त्यांनी सोपविली आहे. मध्य प्रदेशातील गाजलेल्या व्यापम घोटाळ्याशी या घोटाळ्याशी त्यांनी तुलना केली आहे.

Krupal Tumane
Donald Trump decision : ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत 'No Entry'

आता कृपाल तुमाने यांनी शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचा दावा केला आहे. मंत्रालयात बसणारे सचिव स्तरावरील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण सामील असल्याची विश्वसनीय माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Krupal Tumane
Imran Khan : इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या मागे का लागले? पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर!

सद्यस्थितीत सुरू असलेली एसआयटी चौकशी महत्त्वाची असली तरी, या घोटाळ्याची व्याप्ती आणि त्यात गुंतलेले 'मोठे मासे' पाहता, केवळ विदर्भातील चौकशी पुरेशी नसल्याचे तुमाने यांचे म्हणणे आहे. तुमाने यांनी आपल्या पत्रात, या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व शालार्थ आयडींची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. यामुळे घोटाळ्याचे मूळ शोधण्यास मदत होईल आणि दोषींवर कठोर कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास तुमाने व्यक्त केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com