Chandrapur Congress : शंतनू धोटेंच्या उमेदवारी अर्जाचा अर्थ नेमका काय?

Lok Sabha Election 2024 : जिल्हाध्यक्षांच्या पुतण्याने दाखल केलेल्या अर्जाची चर्चा
Shandanu Dhote.
Shandanu Dhote.Sarkarnama
Published on
Updated on

Application For Candidacy : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहेत. अशात काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते. केवळ चंद्रपूर लोकसभा जिंकल्याने काँग्रेसची लाज राखली गेली. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिलेले बाळू धानोरकर यांनी विजयाचा रथ खेचला. अशातच बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे आता काँग्रेस चंद्रपुरात नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

आता काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत राजकीय उत्सुकता आहे. पक्षाकडून नुकतेच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. यात आमदार तथा काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनू धोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार धोटे यांनी वारंवार आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव लोकसभेसाठी समोर केले आहे. अशातच आता त्यांच्याच पुतण्याने उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केल्याने आमदार सुभाष धोटेंच्या ओठात एक अन् पोटात एक आहे की काय, अशी चर्चा रंगली आहे.

Shandanu Dhote.
Chandrapur APMC : उपसभापतिपदासाठी जोरदार ‘फिल्डिंग,’ पिंपळकर-फरकडे आमने-सामने

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ बराच विस्तारला आहे. चंद्रपुरातील चार विधानसभेसह यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. या क्षेत्रातून भाजपचे हसंराज अहिर हे तब्बल चारदा निवडून आले होते. परंतु 2019 मधील मोदीलाटेत त्यांचा काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी पराभव केला.

राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आल्यामुळे व भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे दोन्ही पक्षांसाठी लोकसभेचा चंद्रपूर मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे काही महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले. आता त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी द्यायची, हा मोठा प्रश्न पक्षासमोर आहे. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून मागविण्यात आलेल्या उमेदवारी अर्जात त्यांचाही समावेश आहे. पण चंद्रपूर लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनू धोटे यांनीही उमेदवारी मागितली आहे. शंतनू धोटे हे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. शंतनू यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी चालविली होती. पण आता त्यांनी थेट खासदारकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या मागणीचा अर्थ काय लावायचा, अशी चर्चा सुरू आहे.

चंद्रपूर लोकसभेच्या मागील निवडणुकीत हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता. अद्यापही अहिर हा पराभव पचवू शकलेले नाहीत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी आपला पराभव असा कसा झाला, असा सवाल उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली होती.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Shandanu Dhote.
Chandrapur BJP : महायुतीची पक्की मोट बांधण्यात मुनगंटीवार ठरले यशस्वी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com