Vanchit Youth Aghadi : प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय; ‘वंचित’ची सोलापूर जिल्हा युवा कार्यकारिणी बरखास्त

Solapur District Youth Executive Dismissed : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सोलापूर जिल्हा युवा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय पक्षाकडून तयारी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने मोठे पाऊल उचललेले आहे. वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा युवा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkr) यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सोलापूर जिल्हा युवा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असलेले मतदान होऊ शकलेले नाही. त्याला पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची निष्क्रियतेचा कारणीभूत असल्याची चर्चा होती.

वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेले राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत पक्षाला तोंडघाशी पाडले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांच्या पाठीशी ‘वंचित’ची ताकद उभी केली होती. मात्र, बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाला अपेक्षित असलेले मतदान होऊ शकले नव्हते.

Vanchit Bahujan Aghadi
Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

लोकसभेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातून चांगले मतदान होऊ शकले नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला अपेक्षित काम न करू शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरी पाठविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचितची विद्यमान युवा आघाडी बरखास्त करून नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. तो राजीनामाही बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने दिल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. काम करूनही पक्षाकडून आपली दखल घेतली गेली नाही, अशी खंतही गायकवाड यांनी त्या वेळी व्यक्त केली होती.

Vanchit Bahujan Aghadi
Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विधानसभेला पराभव अटळ; अंबादास दानवेंची भविष्यवाणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com