Vidarbha Politic's : महापालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला हवीय आघाडी; पण काँग्रेसवर भरोसाही नाय!

Congress-NCP SP Alliance : मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा वाटपाची बोलणी फिस्टकली होती. दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्याचा मोठा फटका दोघांनाही बसला होता. काँग्रेसचे 29, तर राष्ट्रवादीचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता.
 Sharad Pawar-Harshvardhan Sakpal
Sharad Pawar-Harshvardhan SakpalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 27 May : महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केली जात आहे. पदाधिकारी आणि इच्छुकांची मतेही जाणून घेतली जात आहेत. स्थानिक निवडणुकीत आघाडी फायद्याची राहील, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असले तरी काँग्रेसचा भरोसा नाही, असाही धोका वर्तविला जात आहे. हे बघता आपण आपली तयारी सुरु ठेवावी आणि काँग्रेससोबत जागा वाटपाच्या वाटाघाटीसुद्धा कराव्यात, असा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची जागा वाटपाची बोलणी फिस्टकली होती. दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्याचा मोठा फटका दोघांनाही बसला होता. काँग्रेसचे फक्त 29 नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादीची गाडी फक्त एका नगरसेवकावर थांबली होती. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसांपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू होती. मात्र काँग्रेस निर्णयच कळवत नव्हती. शेवटी घाईघाईने माजी गृहमंत्री आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले होते. राष्ट्रवादीचे (NCP ) अनेक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. या विभाजनाचा मोठा फायदा भाजपला झाला होता. त्यांचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले. नागपूर महापालिकेच्या इतिहासात भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करता आली होती. त्यापूर्वी दहा वर्षे भाजप सत्तेत होती. याकरिता त्यांना वेगवेगळ्या पक्षाचा आणि अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागला होता.

आता राजकारणात मोठे बदल झाले आहे. राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे. नागपूरकर (Nagpur) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सर्व यंत्रणा भाजपच्या बाजूने आहेत. भाजपची ताकदही चांगलीच वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि माजी मंत्री नितीन राऊत हे दोनच काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

 Sharad Pawar-Harshvardhan Sakpal
Solapur NCP : एकेकाळी सर्वाधिक बलवान असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात सक्षम जिल्हाध्यक्ष मिळेना!

नागपूर शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अनिल देशमुख या वेळी निवडणूक लढले नाहीत. त्यांचे चिरंजीव सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे दोन तुकडे झाले आहेत, त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहरातील अस्तित्व धोक्यात आले आहे. हे बघता बहुतांश पदाधिकाऱ्यांची इच्छा काँग्रेससह इतर छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढावी अशी आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही महाविकास आघाडीत आहे. मतविभाजन होणार नाही, याचे शक्य तितके प्रयत्न करावेत, असे मत राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या वेळी अनेक प्रभागावर दावा करण्यापूर्वी आपली शक्तीही तपासावी, असा सल्ला एका ज्येष्ठ नगरसेवकाने दिला.

 Sharad Pawar-Harshvardhan Sakpal
Satara Politic's : सहन करण्याची मर्यादा आता संपलीय...भाजपसोबत चला; कार्यकर्त्यांच्या आग्रहाला सत्यजित पाटणकारांचे स्पष्ट संकेत

बैठकीत महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकारी माजी गृहमंत्री आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांना देण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. या बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, निरीक्षक मुनाज शेख यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, शहर कार्यकारणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com